AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही अस्वस्थ व्हाल… स्मिता पाटील यांच्यासाठी राज बब्बर यांची खास पोस्ट

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त राज बब्बर यांनी हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. स्मिता पाटील यांच्या अलौकिक प्रतिभेचे, प्रेमळ स्वभावाचे आणि त्यांच्या अविस्मरणीय वारशाचे स्मरण करत, राज बब्बर यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

तुम्हीही अस्वस्थ व्हाल... स्मिता पाटील यांच्यासाठी राज बब्बर यांची खास पोस्ट
Smita PatilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 1:02 PM
Share

बॉलिवूडमधील अत्यंत ताकदीची अभिनेत्री दिवंगत स्मिता पाटील यांची आज 71 वी जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांचे पती आणि अभिनेता राज बब्बर यांनी खास पोस्ट लिहिली आहे. राज बब्बर यांनी इन्स्टावर ही पोस्ट लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. अत्यंत तरल शब्दात राज बब्बर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. स्मिता पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज बब्बर यांची ही पोस्ट वाचल्यानंतर मनात घालमेल झाल्याशिवाय राहत नाही. डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहत नाही.

राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांची असामान्य प्रतिभा, प्रेमळ स्वभाव आणि त्यांच्या अजरामर वारश्याला अभिवादन केलं आहे. स्मिता पाटील या अत्यंत संवेदनशील कलाकार होत्या, असंही त्यांनी म्हटलंय. त्यांनी इन्स्टावर स्मिता पाटील यांचा फोटोही शेअर केला आहे. स्मिताने आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे, असंही त्यांनी म्हटलंय. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलंय. त्यात म्हटलंय, स्मितामध्ये एक अद्भूत संवेदनशीलता होती. तिचा प्रवास भलेही अल्प राहिला असेल, पण तिच्या कलेने अमिट ठसा उमटवला आहे. तिने केवळ व्यक्तिरेखा निभावल्या नाहीत, तर त्याच्या आत्म्यात जीव ओतला आहे. मला तिची प्रचंड आठवण होतेय. तिचं प्रेम, तिची असमान्य प्रतिभा आणि तिला खास बनवणाऱ्या सर्व गोष्टी आठवत आहेत, असं राज बब्बर यांनी म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Raj Babbar (@rajbabbarmp)

आजही मनात घर करून

स्मिताचे मी तिच्या जयंती निमित्ताने स्मरण करत आहे. तिचा वारसा आजही आजच्या पिढीला प्रेरणा देत आहे. प्रभावित करत आहे आणि लोकांच्या मनात घर करून बसला आहे. जेव्हा बोलावणं येतं तेव्हा कलाकार आपल्यातून निघून जातात. पण स्मिताने ज्यांना ज्यांना हात दिला, त्यांच्या मनात आज ती कोणत्या ना कोणत्या रुपात जिवंत आहे, असं राज बब्बर यांनी म्हटलं आहे. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची पहिली भेट 1982मध्ये भीगी पलके या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे. प्रतिक. प्रतिक बब्बरचा जन्म 28 नोव्हेंबर 1986 रोजी झाला. 13 डिसेंबर 1986मध्ये अवघ्या वयाच्या 31 व्या वर्षी स्मिता पाटील यांचं निधन झालं. प्रसृतीशी निगडीत समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर प्रतिकचा सांभाळ स्मिता पाटील यांच्या आईवडिलांनी केला.

अखेरचा सिनेमा

स्मिता पाटील यांनी सिनेमा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. गलियों का बादशाह हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमात राज कुमार, हेमा मालिनी, मिथुन चक्रवर्ती, पूनम ढिल्लो, स्मिता पाटील, अरुणा ईरानी, ​​रंजीत, डॅनी डेन्जोंगपा, ओम शिवपुरी आणि इफ्तिखार आदी कलाकार या सिनेमात होते. या सिनेमाची शुटिंग पूर्ण झाली होती. पण सिनेमा उशिराने प्रदर्शित करण्यात आला होता. तर राज बब्बर हे 2024 मध्ये ‘एक कोरी प्रेम कथा’ मध्ये दिसले होते. राज बब्बर राजकारणात व्यस्त असल्याने सिनेमात फार कमी करतात.

Follow Us
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...