AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pathaan | तीन दिवसांमध्ये पठाण चित्रपटाची बंपर कमाई, विकेंडला होणार अधिक फायदा

अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर सतत बॉयकॉट पठाण ट्रेंड देखील सुरू होता.

Pathaan | तीन दिवसांमध्ये पठाण चित्रपटाची बंपर कमाई, विकेंडला होणार अधिक फायदा
| Updated on: Jan 27, 2023 | 5:51 PM
Share

मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केलाय. बाॅलिवूडमधील अनेक रेकाॅर्ड पठाण चित्रपट आपल्या नावावर करतोय. शाहरुख खान (Shah Rukh Khan)  याने दणदणीत असे पुनरागमन नक्कीच केलंय. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद (Dispute) सुरू झाला. अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर सतत बॉयकॉट पठाण ट्रेंड देखील सुरू होता. यामुळे अनेकांना वाटले होते की, इतर बाॅलिवूडच्या (Bollywood) चित्रपटांप्रमाणेच पठाण हा चित्रपट देखील फ्लाॅप जाईल. प्रत्यक्षात सर्वकाही उलटे झाले आणि चित्रपटाने बाॅक्स आॅफिस आॅफिसवर धमाका केला आहे. चित्रपटाचा ओपनिंग डेही जबरदस्त ठरला.

पठाण चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस उलटले आहेत. चित्रपट सुसाट अशी कामगिरी करतोय. 123 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पठाण चित्रपटाने केले आहे. प्रेक्षकांचे प्रेम पठाण चित्रपटाला मिळत आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर एक ट्विट करून पठाण चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनची माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाचे तीन दिवसांचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन सांगितले आहे.

अंदाजे पठाण चित्रपटाने तीन दिवसांमध्ये १२३ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केल्याचे तरण आदर्श यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाला विकेंडचा फायदा देखील होऊ शकतो.

शनिवार आणि रविवार बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये अजून वाढ होऊ शकते. पठाण चित्रपटाची जेवढी चर्चा होती, त्यापेक्षाही अधिक कमाई ही पठाण चित्रपटाने नक्कीच केलीये.

पठाण चित्रपटाची शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ दिसत आहे. सुरूवातीला या चित्रपटाच्या प्रचंड विरोध करण्यात आला. मात्र, आता या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. फक्त भारतामध्येच नाहीतर इतरही देशामध्ये चित्रपट धमाल करतोय.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा