चित्रपटावरील बॉयकॉट ट्रेंडवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे भाष्य, म्हणाले…

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 4:06 PM

चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social media) पठाण चित्रपटाच्या विरोधात देखील बॉयकॉट ट्रेंड सुरू होता.

चित्रपटावरील बॉयकॉट ट्रेंडवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे भाष्य, म्हणाले...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाॅलिवूड चित्रपटांच्या विरोधात बॉयकॉट ट्रेंड (Boycott trend) सुरू आहे. याचा आतापर्यंत अनेक चित्रपटांना मोठा झटका देखील बसलाय. यामध्ये आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा असो किंवा अक्षय कुमार याचा रक्षा बंधन असो. या बॉयकॉट ट्रेंडमुळे बाॅलिवूडचे अनेक चित्रपट (Movie) फ्लाॅप गेल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान हा कोणत्याही पार्टीमध्येही सहभागी होताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सतत बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. शाहरुख खान याचा नुकताच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट या सर्वांना अपवाद नक्कीच ठरलाय. चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social media) पठाण चित्रपटाच्या विरोधात देखील बॉयकॉट ट्रेंड सुरू होता. मात्र, याचा काहीच फरक पठाण चित्रपटाला बसला नसल्याचे दिसतंय. उलट चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केलीये.

नुकताच बॉयकॉट ट्रेंडवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी परखड मत मांडले आहे. बॉयकॉट ट्रेंडवर आपले मत मांडताना हे व्हायला नाही हवे असेही अनुराग ठाकुर यांनी म्हटले आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे खूप जास्त नुकसान होत असल्याचे देखील अनुराग ठाकुर यांनी म्हटले. एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहेत.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटले की, आपले चित्रपट जगभरात नाव करत आहेत. परंतू बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटांवर परिणाम होतो. वातावरण खराब करण्यासाठी बऱ्याच वेळा लोक काही माहिती नसताना देखील कमेंट करतात. यामुळे मोठे नुकसान होते, हे व्हायला नको.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कार्यकारणी बैठकीमध्ये नेत्यांना चित्रपटाच्या विरोधात बोलताना विचार करण्याचा सल्ला दिला होता. बाॅलिवूडचे चित्रपट फक्त बॉयकॉट ट्रेंडमुळे फ्लाॅप जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळेच फटका बाॅलिवूड चित्रपटांना बसत आहे.

आमिर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर, रणवीर सिंह, कतरिना कैफ, जान्हवी कपूर यांचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. दुसरीकडे साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. आता अनुराग ठाकुर यांनी देखील यावर मत मांडले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI