रंगबेरंगी कपड्यानंतर रणवीर सिंहचा हटके मास्क, नवा लूक पाहून चाहत्यांच्या गंमतीशीर कमेंट्स

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:34 PM, 13 Jan 2021
Ranveer Singh

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर अनेक शो आणि कार्यक्रमात रंगीबेरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो. त्याच्या या स्टाईलमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावर रणवीर सिंहला ट्रोल करण्यात येते. बऱ्याचवेळा चाहत्यांना त्याची कपड्यांची स्टाईल आवडते तर काही वेळा चाहते त्याला कपड्यांची स्टाईल बदलण्याचा सल्ला देखील देतात. रणवीर सिंहचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये रणवीरने हटके प्रकारचे  मास्क घातले आहे.(Photos of Ranveer Singh’s new dressing style go viral on social media)

त्याचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत. रणवीरला वांद्रे येथील डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट केले गेले. यावेळी रणवीरने ट्रॅकसूट घातला होता आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता. मात्र, रणवीरचा हा लूक चाहत्यांना आवडलेला दिसत नाही. या फोटोवर चाहते गंमतीशीर कमेंट करताना दिसत आहेत.

Ranveer Singh

रणवीर सिंह सध्या 83 चित्रपटामध्ये लवकरच दिसणार आहे. हा चित्रपट 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारताने ऐतिहासिक विजयावर आधारीत आहे. रणवीर सिंह यामध्ये कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोणही कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दीपवीरचे चाहतेही या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड ड्रग्ज केसमध्ये दीपिकाची चौकशी झाली होती. दीपिकाला डिप्रेशनचा त्रास असल्याने या चौकशी दरम्यान तिच्यासोबत राहता यावे म्हणून रणवीर सिंहने एनसीबीला विनंती केली असल्याची चर्चा होती.

संबंधित बातम्या : 

Boney Kapoor : बोनी कपूर यांना यापूर्वीही चित्रपटाची ऑफर, ‘या’ चित्रपटात मिळाली होती खास भूमिका

‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगनाविरोधात जोरदार आंदोलन, लोक म्हणाले परत जा, परत जा…!

भजनसम्राट अनुप जलोटा अभिनयाच्या क्षेत्रात, सत्य साई बाबांचा डिट्टो लूक!

 

(Photos of Ranveer Singh’s new dressing style go viral on social media)