मर्सिडीजला बाईक घासली, कारबाहेर उतरुन रणवीरने...

मर्सिडीजने प्रवास करताना बाईक रणवीरच्या कारला घासून गेली. त्यानंतर गाडीचं नुकसान झालं आहे का, हे पाहण्यासाठी रणवीर गाडीबाहेर आला.

मर्सिडीजला बाईक घासली, कारबाहेर उतरुन रणवीरने...

मुंबई : अभिनेता रणवीर सिंहला (Ranveer Singh) पाहण्यासाठी चाहत्यांची नेहमीच गर्दी होत असते. मुंबईतील रस्त्याने प्रवास करणाऱ्या रणवीरच्या आलिशान मर्सिडीज कारला (Mercedes) बाईक चाटून गेली. त्यानंतर गाडीचं नुकसान पाहण्यासाठी रणवीरला कारबाहेर उतरावं लागलं. (Ranveer Singh Inspects Car After Bike Brushes Against his Mercedes)

रणवीर सिंह नुकताच वांद्रे परिसरात गेला होता. आपल्या मर्सिडीजने प्रवास करताना एक बाईक त्याच्या कारला घासून गेली. त्यानंतर, गाडीचं नुकसान झालं आहे का, हे पाहण्यासाठी रणवीर गाडीबाहेर आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रणवीर गाडीतून उतरुन कारच्या डाव्या बाजूची पाहणी करताना दिसतो.

काळ्या रंगाच्या मर्सिडीजने प्रवास करणारा रणवीर स्वतःही काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये होता. जॅकेट, शॉर्ट्स आणि सॉक्स हा सर्व आऊटफीट काळ्या रंगाचा होता. काळा रंग खुलवण्यासाठी त्याने पायात लाल रंगाचे उठावदार स्निकर्स घातले होते. रणवीर नेमका कुठे जात होता, हे मात्र समजलेलं नाही.

अभिनेता रणवीर सिंह लवकरच ’83’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे. या चित्रपटात रणवीरने क्रिकेट संघाचा कर्णधार कपिल देव यांची भूमिका केली आहे. त्यांची पत्नी रोमी देवीच्या भूमिकेत रणवीरची रिअल लाईफ पत्नी – अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे.

त्याशिवाय, ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटातही रणवीर दिसणार आहेत. हा नवोदित दिग्दर्शक दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित एक सामाजिक विनोदी चित्रपट आहे. समाजात स्त्री-पुरुषांच्या समान हक्कावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची भूमिका रणवीर साकारत आहे.

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड ड्रग्ज केसमध्ये दीपिकाची चौकशी झाली होती. दीपिकाला डिप्रेशनचा त्रास असल्याने या चौकशी दरम्यान तिच्यासोबत राहता यावे म्हणून रणवीर सिंहने एनसीबीला विनंती केली असल्याची चर्चा होती. मात्र, तशी कोणतीही परवानगी मागण्यात आली नसल्याचे एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

रणवीर सिंह उपस्थित राहण्याबद्दल कोणतेही विनंती पत्र मिळाले नाही, एनसीबीचा दावा

(Ranveer Singh Inspects Car After Bike Brushes Against his Mercedes)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *