रजनीकांत यांचा 75 व्या वर्षी सलमान, प्रभास यांना धोबीपछाड… ‘जेलर 2’ चं तुफान, 9 दिवसात 5 सिनेमांचे मोडलं रेकॉर्ड
रजनीकांत यांचा 'जेलर 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. वयाच्या 75 व्या वर्षीही त्यांची जादू कायम आहे. या सिनेमाने केवळ 9 दिवसात 628 कोटींहून अधिक गल्ला जमवून सलमान खान आणि प्रभाससारख्या बड्या अभिनेत्यांना मागे टाकले आहे. 'जेलर 2' ने अनेक विक्रम मोडून बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचला आहे.

सुपरस्टार रजनीकांत आणि बॉक्स ऑफिसवर जलवा हे समीकरण ठरलेलंच आहे. वयाच्या पंच्च्याहत्तरीतही रजनीकांत यांचा जलवा कायम आहे. त्यांचा ‘जेलर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने तुफान उठवलंय. या सिनेमाने केवळ पैशाचा पाऊसच पाडलेला नाहीये, तर बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचला आहे. त्यामुळे बॉलिवूडचे भले भले अभिनेतेही आवाक झाले आहेत.
रजनीकांत यांच्या जेलर 2 ला नवरात्री आणि दसऱ्याच्या सुट्ट्यांचा मोठा फायदा झालेला दिसतोय. जेलर 2 ने पहिल्या आठवड्यात जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा गल्ला जमवला आहे. एवढंच नव्हे तर जेलर 2 ने नवव्या दिवशीही घसघशीत कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच शुक्रवारी या सिनेमाने भारतात 14.50 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सिनेमाचे नवव्या दिवशी देशभरात 10,484 शो चालले.
तमिळ व्हर्जनची सर्वाधिक कमाई
सॅकनिल्कच्या रिपोर्टच्या मते, भाषेच्या बाबत पाहिलं तर या सिनेमाच्या तमिळ व्हर्जनचा दबदबा कायम आहे. ‘जेलर 2’ ने तमिळ भाषेतली 4,885 शोजमधून 9.35 कोटी रुपये कमावले आहेत. तेलुगू व्हर्जनने 1,787 शोजद्वारे 3 कोटीचा बिजनेस केला आहे. तर हिंदी जेलर 2 ला 3,624 शोज मिळाले असून त्यातून 1.75 कोटींची कमाई झाली आहे. कन्नड़ व्हर्जनने 188 शोमधून 40 लाख रुपये कमावले आहेत.
9 दिवसाच्या बिजनेसनंतर रजनीकांतच्या जेलर 2 ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 408.55 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केलं आहे. भारतात या सिनेमाचं नेट कलेक्शन 348.85 रुपये आहे. तर परदेशात बॉक्स ऑफिसवर ‘जेलर 2’ ने 219.50 कोटीची कमाई केली आहे. त्यासोबतच या सिनेमाने जगभरात एकूण 628.05 कोटी रुपये कलेक्शन केलं आहे.
सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
रजनीकांत यांचा जेलर-2 सिनेमा दुसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक कमाई करणारा भारतातील एकमेव सिनेमा ठरला आहे. थलाइवा यांच्या या सिनेमाने सलमान खान, प्रभास आणि विजयसहीत अनेक बड्या कलाकारांना मागे टाकत नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलं आहे. ‘जेलर 2’ टॉप 20 हाएस्ट ग्रॉसिंग सिनेमांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
रजनीकांत यांच्या जेलर 2 ने 628.05 कोटींचं कलेक्शन करून सलमान खानच्या सुल्तानला मागे टाकलं आहे. 10 वर्षापूर्वी सलमान आणि अनुष्का शर्माचा सुल्तान आला होता. या सिनेमाने 623 कोटींचं लाइफटाइम कलेक्शन केलं होतं. जेलर 2 ने प्रभासच्या सालार आणि अहान पांडे-अनीत पड्डाच्या सैयाराचंही रेकॉर्ड मोडलं आहे.
प्रभासलाही धोबीपछाड
प्रभासच्या सालारने बॉक्स ऑफिसवर 617 कोटी रुपये कमावले होते. तर गेल्यावर्षी आलेल्या सैयाराने बॉक्स ऑफिसवर 578 कोटींचं कलेक्शन केलं होतं. या सर्वांना मागे टाकत जेलर 2 ने बॉक्स ऑफिसवर वेगाने कलेक्शन केलं आहे. केवळ 9 दिवसातच सर्वाधिक कमाई करणारा हा तमिळ सिनेमा ठरला आहे.
जेलर-2 ने पहिल्या जेलर या सिनेमालाही मागे टाकलं आहे. नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनात हा सिनेमा बनला आहे. तमिळ सिनेमातील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने विजयच्या लिओचं रेकॉर्डही तोडलं आहे. सुपरस्टार विजयच्या या सिनेमाने 605 कोटींचं कलेक्शन केलं होतं.
