AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयानक गर्दीतून लहान मुलीचा वाचवला जीव, पेद्दी स्टार राम चरणच्या त्या कृतीचं होतंय कौतुक; थिएटर बाहेरच…

तेलुगू सुपरस्टार राम चरणने 'पेद्दी' सिनेमाच्या थिएटरमध्ये अनपेक्षितपणे हजेरी लावली. यामुळे चाहते मोठ्या संख्येने जमा झाले, गर्दी अनियंत्रित झाली. गर्दीच्या धक्काबुक्कीत एक लहान मुलगी तिच्या कुटुंबीयांपासून दुरावली. राम चरणने तात्काळ हस्तक्षेप करत तिला सुरक्षित बाहेर काढले आणि तिच्या पालकांच्या हवाली केले.

भयानक गर्दीतून लहान मुलीचा वाचवला जीव, पेद्दी स्टार राम चरणच्या त्या कृतीचं होतंय कौतुक; थिएटर बाहेरच...
ram charanImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 08, 2026 | 8:49 PM
Share

तेलुगू सुपरस्टार राम चरणने रविवारी त्याच्या फॅन्सला एक शानदार सरप्राईज द्यायचं ठरवलं. त्यानुसार त्याने त्याचा पेद्दी सिनेमा सुरू असलेल्या थिएटरमध्ये अचानक प्रवेश केला. त्याच्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शक बुची बाबू सनही होते. निर्माताही होता. त्यानंतर काय राम चरणने त्याच्या फॅन्ससोबत बसून संपूर्ण सिनेमा एन्जॉय केला. चाहत्यांच्या टाळ्या, शिट्ट्या, कमेंट्स आणि उत्साह पाहून राम चरण भारावून गेला होता.

राम चरणने हैद्राबादच्या पीसीएक्स स्क्रीनवर त्याचा सिनेमा पाहिला. हैद्राबादमधील हे सर्वात मोठं थिएटर आहे. राम चरणच्या या सरप्राईज व्हिजिटचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात राम चरण चाहत्यांसोबत बसून सिनेमा पाहताना दिसत आहे. विशेष म्हणजे राम चरणची थिएटरमध्ये एन्ट्री झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सिनेमा पाहायचं सोडून राम चरणचे फोटो आणि व्हिडीओ काढणं पसंत केल्याचं या व्हायरल व्हिडीओतून पाहायला मिळतंय.

गर्दी अनियंत्रित झाली…

पण जेव्हा सिनेमा संपला तेव्हा थिएटरच्या बाहेर हजारोंच्या संख्येने त्याचे चाहते जमले होते. थिएटर बाहेर एवढी मोठी गर्दी पाहून काही वेळासाठी राम चरणही अचंबित झाला. त्याने यावेळी या गर्दीला हात उंचावून धन्यवाद दिला. जे भेटायला आले, त्यांच्याशी राम चरणने हस्तांदोलनही केलं. पण त्यामुळे प्रत्येकजण राम चरणच्या हातात हात घेण्यासाठी धडपड करत होता. त्यामुळे गर्दी आणखीनच वाढली. गर्दी अनियंत्रित झाली. धक्काबुक्की सुरू झाली.

मुलीला वाचवलं

लोंढाचा लोंढा राम चरणच्या दिशेने येऊ लागला. त्यामुळे राम चरणला या गर्दीपासून वाचवण्यासाठी त्याच्या बॉडीगार्डला खूप मेहनत करावी लागली. एवढेच नव्हे तर राम चरण सुरक्षित राहावे म्हणून डायरेक्टर बुची बाबू सनही राम चरणला जागा देत होते. राम चरण गर्दीतून आरामशीर बाहेर निघून जावेत म्हणून बुची बाबू सन यांचा प्रयत्न होता. पण गर्दीतून वाट काढणं मुश्कील झालं होतं. त्यानंतर गर्दीची धक्काबुक्की अधिकच सुरू झाली. लोक एकमेकांवर पडू लागले. एकमेकांना ढकलू लागले. यावेळी या गर्दीत एक छोटी मुलगी तिच्या कुटुंबीयांपासून दुरावली.

खरा सुपरस्टार

राम चरणच्या हे लक्षात येताच त्यांनी या मुलीला जवळ घेतलं आणि तिला तिच्या आईवडिलांची भेट घालून दिली. राम चरण आणि त्याच्या सेक्युरीटीने या मुलीला सुरक्षितपणे गर्दीतून बाहेर काढलं. त्यानंतर या मुलीला तिच्या वडिलांच्याहवाली केलं. जर राम चरणचं या मुलीकडे लक्ष गेलं नसतं तर उतावीळ भीडमध्ये ही मुलगी चिरडली गेली असती. पण राम चरणने या मुलीकडे तात्काळ लक्ष देऊन तिला तिच्या कुटुंबीयांच्या हवाली केलं. त्याच्या या स्वभावाचं सर्वत्र कौतुक होत आहे. राम चरणने या मुलीला वाचवून तो खरा सुपरस्टार असल्याचं दाखवून दिल्याचं लोक म्हणत आहेत.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा