AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोट न घेता 35 वर्षे वेगळं राहिले.. नाना पाटेकर यांचं पत्नीपासून दूर राहण्यामागचं कारण तरी काय?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि पत्नी नीलकांती पाटेकर गेल्या 35 वर्षांपासून वेगळे का राहतात? काय आहे नेमकं कारण?

घटस्फोट न घेता 35 वर्षे वेगळं राहिले.. नाना पाटेकर यांचं पत्नीपासून दूर राहण्यामागचं कारण तरी काय?
| Updated on: Jun 08, 2026 | 7:14 PM
Share

Nana Patekar : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या दमदार अभिनय, प्रभावी आवाज आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यांची वैयक्तिक आयुष्याची कहाणीही अनेकदा चर्चेत असते. विशेष म्हणजे, नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेला नसतानाही ते गेली सुमारे 35 वर्षे स्वतंत्रपणे राहत आहेत. त्यांच्या नात्याबाबत अनेकांना उत्सुकता असते.

नीलकांती पाटेकर यांनी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 1966 मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्या बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी मराठी अभिनेत्री आणि लेखिका म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. काही काळ त्यांनी मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अलीकडेच त्यांनी छावा या चित्रपटातून पुनरागमन केले. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत विकी कौशल झळकला होता.

थिएटरमधून सुरू झाली प्रेमकहाणी

नाना पाटेकर आणि नीलकांती यांची पहिली भेट थिएटरमध्ये झाली होती. नाटकाच्या माध्यमातून दोघांची ओळख वाढली आणि हळूहळू त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले. काही वर्षांच्या सहवासानंतर 1978 मध्ये त्यांनी विवाह केला.

लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. दुर्वासा पाटेकर आणि मल्हार पाटेकर. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःखही आले. मोठा मुलगा दुर्वासा हा गंभीर आरोग्य समस्यांनी त्रस्त होता. अवघ्या अडीच वर्षांच्या वयात त्याचे निधन झाले. या घटनेचा दोघांवरही मोठा मानसिक परिणाम झाला.

घटस्फोट नाही, पण 35 वर्षांपासून वेगळे वास्तव्य

नाना पाटेकर आणि नीलकांती पाटेकर यांनी आजपर्यंत घटस्फोट घेतलेला नाही. तरीही ते गेली अनेक दशके वेगवेगळे राहत आहेत. काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी यामागचे कारण स्पष्ट केले होते.

त्यांच्या मते, दोघांच्या स्वभावात आणि विचारसरणीत खूप फरक होता. वैवाहिक नाते टिकवून ठेवताना सतत मतभेद होण्यापेक्षा परस्पर संमतीने स्वतंत्र राहणे हा अधिक योग्य पर्याय असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे