AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचे दोन तट पडणार, आशियात युद्ध पेटणार, चीन आणि नाटोवर माजी रॉ एजंटच्या दाव्याने वाढले टेन्शन

इराण आणि इस्रायलमध्ये पुन्हा युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर मिसाईल डागल्या आहेत. त्यामुळे शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. आता रॉच्या माजी एजंटच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

जगाचे दोन तट पडणार, आशियात युद्ध पेटणार, चीन आणि नाटोवर माजी रॉ एजंटच्या दाव्याने वाढले टेन्शन
iran - israel war
| Updated on: Jun 08, 2026 | 7:06 PM
Share

पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्याला उत्तर देताना इस्रायलने सोमवारी इराणच्या अनेक शहरात भीषण हल्ला केला आहे. इराणच्या स्थानिक मीडियातील बातमीनुसार तेहराण, तबरीज आणि इस्फहानमध्ये धमक्यांच्या आवाज ऐकायला आले आहे. इस्रायलच्या भीषण हवाई हल्ल्यानंतर तेहराणच्या खुमैनी इंटरनॅशनलच्या जवळच्या एअर पोर्टला बंद केले आहे.

दोन्ही देशात भडकलेल्या या युद्धाननंतर कथिकत माजी रॉ एजंट आणि माजी एनएसजी कमांडो लकी बिष्ठ यांनी दावा केला आहे की इस्रायल-इराणचा पलटवार ही केवळ सुरुवात आहे. खरे वादळ तर येणे बाकी आहे. त्यांनी दावा केला की या इराण युद्धाने नाटोची एण्ट्री होईल आणि त्यानंतर जग दोन भागात वाटले जाईल. त्यांनी चीन आणि तैवान संदर्भातही आश्चर्यचकीत करणारा दावा केला आहे लकी बिष्ट यांनी आपल्या इनपूटने दावा केला आहे की नोव्हेंबर दरम्यान चीन आणि तैवानच्या दरम्यान युद्ध सुरु होऊ शकते.

१८ नोव्हेंबरनंतर युद्धाचे विक्राळ रुप

रॉ एजंट आणि माजी एनएसजी कमांडो लकी बिष्ठ यांनी एक्सवर पोस्ट केले आहे की १८ नोव्हेंबर २०२६ नंतर हे युद्ध खूपच विक्राळ रुप घेणार आहे. बिष्ट यांनी सांगितले जे नाटोचे (NATO) देश आता मागे आहेत, ते आता उघडपणे मैदानात येतील आणि जग दोन भागात विभागले जातात. या नोव्हेंबर महिन्यात चीन आणि तैवान दरम्यान एका मोठ्या युद्धाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. गोष्ट एवढ्यावर थांबणार नाही तर ही आग पुढे हळूहळू संपूर्ण आशियाला कवेत घेईल. आपण एका महाविनाशाच्या दिशेने जात आहोत.

इराण – इस्रायल युद्ध पुन्हा पेटले –

सीएनएनच्या रिपोर्टनुसार इराणने रविवारी किमान १० बॅलिस्टिक मिसाईल इस्रायलवर डागल्या. या मिसाईल किमान तीन वेग-वेगळ्या टप्प्यात सोडण्यात आल्या. इस्रायलच्या सैन्याचे म्हणणे आहे की सर्व मिसाईलला अर्ध्या रस्त्यात रोखण्यात आले.

येथे पोस्ट पाहा –

इराणने केलेल्या हल्ल्याने भडकलेल्या इस्रायलच्या वायूसेनेने काही तासातच तेहराणवर भीषण हल्ला केला. इस्रायलने पश्चिमी आणि मध्य इराणच्या अनेक महत्वाच्या सैन्य स्थळांना लक्ष्य ठेवले. इस्रायलच्या हवाई हल्लानंतर इराणने राजधानी तेहराणच्या इमाम खुमैनी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आजूबाजूचू एअरस्पेस बंद केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देत सांगितले की त्याने इस्रायलवर मिसाईल डागने बंद करावे आणि चर्चेच्या टेबलवर यावे. हे वक्तव्य तेव्हा आले जेव्हा इराणने इस्रायलच्या दिशेने बॅलेस्टिक मिसाईलने नवीन हल्ले केले.

ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना म्हटले की मी इराणला हेच सांगेन की तुम्ही तुमची मिसाईल डागल्या, आता बस्स करा, पुन्हा मेजवर या आणि शांततेचा करार करा.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत