9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य; डिजेच्या तालावर…
पुण्यातील चर्चेत असलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या मुलांच्या आई-वडिलांना पुणे पोलीस लवकरच बोलावून घेणार आहेत. त्यांच्या मुलांनी मध्यरात्री उशिरापर्यंत पार्टीमध्ये सहभाग घेतल्याची माहिती पालकांना दिली जाणार आहे.
पुण्यातील चर्चेत असलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या मुलांच्या आई-वडिलांना पुणे पोलीस लवकरच बोलावून घेणार आहेत. त्यांच्या मुलांनी मध्यरात्री उशिरापर्यंत पार्टीमध्ये सहभाग घेतल्याची माहिती पालकांना दिली जाणार आहे. या पार्टीत 3 अल्पवयीन मुलं सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात महागडी दारू पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या फोटोंमध्ये महागड्या दारूच्या बाटल्या दिसून आल्या आहेत. एका बाटलीची किंमत तब्बल 65 ते 70 हजार रुपये असल्याची माहिती आहे. पोलिसांनी साडे 9 लाख रुपयांची दारू सील केली आहे. तसेच 2 हुक्का स्पॉट आणि 9 ग्राम गांजाही जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात वापरण्यात आलेला महागडा DJ देखील पोलिसांनी जप्त केला आहे. या DJ ची किंमत जवळपास 1 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. पंचनामा करून सर्व साहित्य टेम्पोमधून जप्त करण्यात आले. चालकासह एकूण 78 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Jun 08, 2026 05:20 PM
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट...
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय

