इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच इतर प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली.

या बैठकीत भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पत्रात SIR आणि NEET पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच महागाई, बेरोजगारी आणि घोटाळ्यांवरही विरोधकांनी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत महत्त्वाची भूमिका मांडली. इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा, असे त्यांचे मत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. लोकांसमोर नेतृत्व करणारा चेहरा स्पष्टपणे मांडला पाहिजे, असेही ठाकरे यांनी बैठकीत नमूद केले. आगामी ऑगस्ट महिन्यात पुन्हा इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याची माहितीही देण्यात आली.
Published on: Jun 08, 2026 06:40 PM
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..