AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी दीक्षितचं स्थळ आलं, पण…सुरेश वाडकर यांनी सांगितलं त्या अधुऱ्या लग्नाची गोष्ट; काय घडलं होतं?

गायक सुरेश वाडकर यांनी अखेर त्या जुन्या अफवेवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये असे म्हटले जात होते की त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितला 'ती खूप सडपातळ (बारीक)' असल्याच्या कारणावरून लग्नाला नकार दिला होता.

माधुरी दीक्षितचं स्थळ आलं, पण...सुरेश वाडकर यांनी सांगितलं त्या अधुऱ्या लग्नाची गोष्ट; काय घडलं होतं?
Suresh Wadkar and madhuriImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 08, 2026 | 6:58 PM
Share

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. एकेकाळी माधुरीची इतकी क्रेझ होती की तिच्या मागे तरुण दिवाने होते. पण माधुरीच्या कुटुंबियांनी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीचे लग्न लावण्याआधी तिचे स्थळ सुरेश वाडकर यांच्यासाठी पाठवले होते. पण सुरेश वाडकर यांनी माधुरी खूप बारीक असल्यामुळे नकार दिल्याच्या चर्चा रंगल्या. आता कित्येक वर्षांनंतर सुरेश वाडकर यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘द लल्लनटॉप’ (The Lallantop) ला दिलेल्या एका मुलाखतीत या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना वाडकर म्हणाले, “अरे देवा, ती माधुरीवाली अफवा! माधुरी तर एखाद्या दिवशी माझ्या डोक्यावर जे थोडेफार नैसर्गिक केस उरलेत, तेही ओढून काढेल. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. इंडस्ट्रीतील सहकारी आहे आणि मला ती खूप आवडते.”

अर्चना पुरण सिंग यांच्यावर मिश्किल आरोप

या अफवेचे खापर मिश्किलपणे अर्चना पुरण सिंग यांच्यावर फोडत सुरेश वाडकर पुढे म्हणाले, “हा सगळा खोडसाळपणा अर्चना पुरण सिंगचा आहे. ती माझ्या बहिणीसारखी आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करते. माहिती नाही तिने हे कुठून ऐकले आणि थेट टीव्हीवर बोलून दिले. तेव्हापासून माझ्या जेवढ्या मुलाखती होतात, त्या सर्वांमध्ये मला हमखास हाच प्रश्न विचारला जातो.”

माधुरीशी कधी यावर चर्चा झाली का?

याच मुलाखतीदरम्यान वाडकर यांना विचारण्यात आले की, त्यांनी कधी या अफवेबद्दल माधुरी दीक्षितशी चर्चा केली आहे का? त्यावर खुलासा करताना ते म्हणाले, “असे होऊ शकते की त्या काळात असा एखादा किस्सा घडला असेल. कदाचित तिच्या वडिलांकडून काही विचारणा झाली असेल. पण लोक असे लिहितात की, ती खूप बारीक असल्यामुळे सुरेश वाडकरांनी तिला नकार दिला होता.”

गायक पुढे म्हणाले, “ती बारीक तर होतीच. जर तुम्ही ‘अबोध’ चित्रपट पाहिलात, तर त्यात ती अगदी तशीच बारीक होती. पण लग्नाची मागणी माझ्यापर्यंत पोहोचलीच नव्हती, तर मग मी नकार कसा देणार? आणि तोपर्यंत पद्मा (त्यांची पत्नी) माझ्या आयुष्यात आली होती. पद्मा माझी विद्यार्थिनी राहिली आहे.”

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे