Real Story Based Movies | ‘दंगल’ ते ‘शेरशहा’, सत्य घटनांवर आधारित बॉलिवूडचे दमदार चित्रपट

| Updated on: Sep 04, 2021 | 7:25 AM

असे म्हणतात की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. समाजात जे काही घडले किंवा घडत आहे, तेच चित्रपटांमध्ये दाखवले जाते. चित्रपट निःसंशयपणे काल्पनिक कथांवर आधारित असतात. परंतु, बॉलिवूडमध्ये असेही अनेक चित्रपट बनले आहेत, जे वास्तविक कथांवर आधारित आहेत.

Real Story Based Movies | ‘दंगल’ ते ‘शेरशहा’, सत्य घटनांवर आधारित बॉलिवूडचे दमदार चित्रपट
Real Story movies
Follow us on

मुंबई : असे म्हणतात की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. समाजात जे काही घडले किंवा घडत आहे, तेच चित्रपटांमध्ये दाखवले जाते. चित्रपट निःसंशयपणे काल्पनिक कथांवर आधारित असतात. परंतु, बॉलिवूडमध्ये असेही अनेक चित्रपट बनले आहेत, जे वास्तविक कथांवर आधारित आहेत. या कथा अंडरवर्ल्ड, राजकारण, दहशतवादी घटना, प्रेम कथा, गुन्हे, युद्ध, बनावट इत्यादी कथांवर आधारित आहेत. जर अशा चित्रपटांची यादी मोजली गेली तर ते या बॉलिवूडच्या इतिहासात खूप असतील.

आज आपण अशाच बॉलिवूड चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, जे खऱ्या घटनांवर आधारित होते. हे चित्रपट प्रेक्षकांमध्ये केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या कथांच्या आधारे देखील पसंत केले गेले. बॉलिवूडच्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी अशा चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांना रुपेरी पडद्यावर अजरामर केले.

शेरशाह

‘शेरशाह’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली. हा चित्रपट Amazon प्राइम व्हिडीओच्या सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. विशेष बाब म्हणजे हा चित्रपट समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनाही आवडत आहे. हा चित्रपट कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर आयुष्यावर आधारित आहे, जे युद्धादरम्यान शहीद झाले होते. ही कथा विक्रम बत्रा यांचे जीवन, त्यांचे देशावरील प्रेम आणि डिंपल यांचे चित्रण करते. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते.

छपाक

प्रसिद्ध गीतकार गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘छपाक’ अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित होता. दीपिका पदुकोणने या चित्रपटात लक्ष्मीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मीस्सी आणि रोहित सुखवानी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात दीपिकाच्या सहज अभिनयाने लक्ष्मीचे आयुष्य लाखो प्रेक्षकांसमोर आणले.

‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’

हा चित्रपट देशातील पहिल्या महिला एअरफोर्स पायलटच्या जीवनावर आधारित आहे. गुंजन सक्सेना कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलात पायलट होत्या. त्यांनी 1999मध्ये युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याला मदत केली आणि जखमी सैनिकांची सुटका केली. या चित्रपटात जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी मुख्य भूमिकेत आहेत.

सुपर 30

‘सुपर 30’ हा एक चरित्रात्मक चित्रपट आहे. चित्रपटाची कथा आनंद कुमार या प्रसिद्ध शिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे, जो बिहारमधील गरीब मुलांना सुपर 30 कोचिंग चालवणारे प्रसिद्ध शिक्षक आणि त्यांचे जीवन यात चितारले आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने 146 कोटींचा व्यवसाय केला.

सरबजीत

हा चित्रपट पाकिस्तानातील भारतीय कैदी सरबजीतच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात सरबजीत सिंग आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. सरबजीत हा तो माणूस आहे, ज्याला पाकिस्तानने हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले होते. यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला निर्दोष सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही त्याला वाचवू शकले नाही. या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा :

Sidnaaz : सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याचा प्रचंड धक्का; शहनाजला दु:ख आवरेना

Video : ‘टकाटक’नंतर आता ‘एक नंबर’ चित्रपटाची धूम, मोशन पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित