Video : ‘टकाटक’नंतर आता ‘एक नंबर’ चित्रपटाची धूम, मोशन पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित

‘टकाटक’च्या यशानंतर मिलिंद यांच्या ‘एक नंबर’ या चित्रपटातही प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ('Ek Number' movie's motion poster is released on social media)

Video : ‘टकाटक’नंतर आता ‘एक नंबर’ चित्रपटाची धूम, मोशन पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 2:18 PM

मुंबई : मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने (Takatak) बॉक्स ऑफिसवर विक्रमी व्यवसाय करत 2019 च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं. ‘टकाटक’च्या माध्यमातून रसिकांचं यशस्वी मनोरंजन केल्यानंतर मिलिंद कवडे नेमके कोणत्या प्रकारचा नवीन चित्रपट घेऊन येणार याबाबत कुतुहल निर्माण झालं होतं. मिलिंद एका नव्या चित्रपटाच्या कामात बिझी होते. हा चित्रपट नेमका कोणता आहे या रहस्यावरून आता पडदा उठला आहे.

पाहा मोशन पोस्टर

‘एक नंबर’ चित्रपटाचं लक्षवेधी मोशन पोस्टर

करियरमधील पहिल्या चित्रपटापासून रसिकांची आवड ओळखून आपल्या मनातील विषय यशस्वीपणे सादर करणारे मिलिंद पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘एक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचं लक्षवेधी मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.

एक नंबर’ या चित्रपटाचं टायटलही खरोखर कडक

धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत तसेच आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार झालेल्या ‘एक नंबर’ या चित्रपटाची निर्मिती करण्याची जबाबदारी महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाद्वारे धुमाळ प्रोडक्शन सिनेनिर्मितीकडं वळलं आहे. लक्षवेधी शीर्षक असलेले चित्रपट बनवण्यात आघाडीवर असलेल्या मिलिंद यांच्या ‘एक नंबर’ या चित्रपटाचं टायटलही खरोखर कडक आहे. ‘येडयांची जत्रा’पासून मिलिंद यांनी सुरू केलेला दिग्दर्शनातील प्रवास ‘टकाटक’सारख्या हिट चित्रपटासोबत ‘एक नंबर’ या सिनेमापर्यंत येऊन पोहोचला आहे. यावेळी मिलिंद मिस्ट्री कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असल्याची झलक रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळते.

‘मिलिंद कवडे’ यांनी व्यक्त केल्य भावना

‘एक नंबर’ या चित्रपटाबाबत मिलिंद म्हणाले की, चित्रपटाच्या कथेला पूरक शीर्षक ठेवणं हे त्यातील विषयाला न्याय देण्यासाठी गरजेचं असतं. या चित्रपटाचं ‘एक नंबर’ हे शीर्षकही कथानकाला साजेसं असल्यानंच ठेवण्यात आल्याचं रसिकांना चित्रपट पाहिल्यावर जाणवेल. या माध्यमातून मिस्ट्री कॉमेडी हा जॉनर हाताळला असून, प्रेक्षक त्याला नक्कीच दाद देतील अशी आशाही मिलिंद यांनी व्यक्त केली आहे.

‘एक नंबर’ या चित्रपटा प्रथमेश परब झळकणार मुख्य भूमिकेत

‘टकाटक’च्या यशानंतर मिलिंद यांच्या ‘एक नंबर’ या चित्रपटातही प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेशच्या जोडीला मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा धावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली असून संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. हजरत शेख (वली) या चित्रपटाचे डीओपी आहेत. पटकथा सहाय्यक म्हणून संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी काम पाहिले आहे. संकलन प्रणव पटेल यांनी केलं असून पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. जय अत्रेनं लिहिलेल्या गीतरचना संगीतकार वरूण लिखते यांनी संगीतबद्ध केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Sidharth Shukla dies : ‘SidNaaz’ची जोडी तुटली, सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडली शहनाज गिल

Sidharth Shukla Passes away | सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, जाणून घ्या तरुण का ठरतायत हृदयविकाराचे बळी…

Siddharth Shukla Passes away : अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली आणि सकाळी तो उठूच शकला नाही!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.