Sidharth Shukla dies : ‘SidNaaz’ची जोडी तुटली, सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडली शहनाज गिल

बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये सिद्धार्थ आणि शहनाज एकमेकांशी भांडतानाही दिसले, तर दुसरीकडे दोघं एकमेकांची काळजीही घेताना दिसले. दोघंही एकमेकांसोबत खूप सुंदर बॉन्ड शेअर करायचे. (Sidharth Shukla dies: sidnaaz beautiful chemistry, Shahnaz Gill shocked after Siddharth's Death)

1/5
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, एक अशी व्यक्ती आहे जी सिद्धार्थच्या या बातमीवर विश्वासच ठेऊ शकणार नाही. ती व्यक्ती आहे- शहनाज गिल. वर्ष 2019 मध्ये, जेव्हा शहनाज आणि सिद्धार्थ रिअॅलिटी शो बिग बॉस 13 चा भाग बनले तेव्हा दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. ट्विटरवर नेहमीच एक ट्रेंड होता - सिडनाझ. आता सिडनाझची ही जोडी तुटली आहे.

2/5
ऑनलाइन मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा शहनाजला सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा ती तिच्या एका शूटिंगमध्ये व्यस्त होती. शहनाजला सिद्धार्थबद्दल कळताच तिनं शूटिंग सेट सोडला. त्याचवेळी अभिनेत्री सना खान म्हणते की, सिद्धार्थच्या बातमीनं शहनाज पूर्णपणे तुटली आहे.

3/5
नुकतंच दोघं डान्स दिवाने या शोमध्ये दिसले होते, या शोमध्ये पुन्हा एकदा रोमान्स आणि दोघांचं प्रेम प्रेक्षकांनी पाहिले.

4/5
बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये आपण सिद्धार्थ आणि शहनाज एकमेकांशी भांडतानाही पाहिले, तर दुसरीकडे दोघंही एकमेकांची काळजी घेताना दिसले. दोघंही एकमेकांसोबत खूप सुंदर बॉन्ड शेअर करायचे.

5/5
एकदा सिद्धार्थने शहनाजबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शहनाज एक हसणारी व्यक्ती आहे, ती कोणाच्याही जवळ असते तेव्हा ती सकारात्मकता पसरवते. आता या प्रिय मित्राच्या जाण्यानं शहनाज पूर्णपणे खचली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI