शाहरुख खानसाठी काहीही…किंग खानला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी साधूंचा 165 किलो मीटरचा प्रवास

शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. इतकेच नाही तर शाहरुख खान याच्यासाठी हे वर्ष अत्यंत लकी ठरले आहे. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. या वर्षात शाहरुख खान याचे अजून दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

शाहरुख खानसाठी काहीही...किंग खानला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी साधूंचा 165 किलो मीटरचा प्रवास
| Updated on: Apr 22, 2023 | 8:02 PM

मुंबई : आज ईदनिमित्त बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केलीये. शाहरुख खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते देशातील विविध कोणामधून मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी शाहरुख खान याने देखील चाहत्यांना अजिबात नाराज केले नसून शाहरुख खान हा चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बाहेर आला. शाहरुख खान याला पाहून चाहत्यांनी एकच गोंधळ केला. आज शाहरुख खान याच्या मन्नत बाहेर मोठी गर्दी बघायला मिळत आहे. पोलिस मोठ्या प्रमाणात तिथे तैनात करण्यात आले आहेत.

सलमान खान असो किंवा शाहरुख खान ईदच्या दिवशी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी ही कायमच बघायला मिळते. कारण दरवर्षी शाहरुख खान आणि सलमान खान हे ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडतात. यंदाही सकाळपासूनच शाहरुख खान याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली. ही गर्दी सतत वाढताना दिसत आहे.

शाहरुख खान याची एक झलक बघायला मिळावी, यासाठी चाहते मोठ्या संख्येने जमले. शेवटी गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसला. शाहरुख खान याला पाहून चाहत्यांनी मोठा गोंधळ केला. शाहरुख खान चाहत्यांना भेटण्यासाठी मन्नत बाहेर पडल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.

ईदनिमित्त शाहरुख खान याला विविध धर्माचे लोक भेटण्यासाठी आज मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. चक्क एक साधू हे नाशिकवरून शाहरुख खान याची एक झलक पाहण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले. आता याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. बाॅलिवूडच्या इतरही अनेक कलाकारांनी चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिल्या आहेत.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे अजून दोन चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा बाॅलिवूड चित्रपट ठरला आहे.

विशेष म्हणजे डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शाहरुख खान याच्यासाठी हे वर्ष अत्यंत लकी ठरल्याचे बोलले जात आहे. शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान हे याच वर्षी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.