Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्या घराबाहेर सौम्य लाठीचार्ज, हजारो चाहते अचानक रस्त्यावर आणि…
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. शाहरुख खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केलीये. आज सकाळपासूनच शाहरुख खान याच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी ही बघायला मिळत आहे.

मुंबई : आज संपूर्ण देशामध्ये ईद साजरी होताना दिसत आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. आज सकाळपासूनच ईदनिमित्त बाॅलिवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी ही बघायला मिळत आहे. चाहते आपल्या आवडत्या स्टारला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. शाहरुख खान असो किंवा सलमान खान (Salman Khan) यांच्या वाढदिवसाला आणि ईदला चाहते नेहमीच त्यांच्या घराबाहेर गर्दी करतात. शाहरुख खान याने नुकताच मन्नत बाहेर येत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. याचे अनेक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.
शाहरुख खान याच्या घराबाहेरील गर्दी सातत्याने वाढताना दिसत आहे. आता शाहरुख खान याच्या घराबाहेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. ईदनिमित्त शाहरुख खान याला पाहण्यासाठी हजारो चाहते अचानक रस्त्यावर आले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला आहे. ही गर्दी सातत्याने वाढत होती.

शाहरुख खान याला पाहण्यासाठी मन्नतच्या बाहेर मोठ्या संख्येने चाहते जमा झाले आहेत. मन्नत बंगल्यासमोर उभे राहून शाहरुख खान याचे चाहते जोरजोरात ओरडत आहेत. पोलिस गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची दमछाक होत आहे. शाहरुख खान याने काही वेळेपूर्वीच मन्नत बाहेर येत सर्वांनाच ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख खान याच्या वाढदिवसाच्या दिवशीही त्याचे चाहते मन्नत बाहेर मोठी गर्दी करतात. शाहरुख खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते मुंबईमध्ये पोहचतात. शाहरुख खान याने आज ईदच्या दिवशी आपल्या चाहत्यांना निराश न करता मन्नत बाहेर येत मोठे गिफ्ट दिले. मात्र, पोलिसांना या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज हा करावा लागला आहे. ज्यानंतर गर्दी पांगली. चाहते शाहरुख खान याच्या घराबाहेर जोरात ओरडताना देखील दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने जबरदस्त अशी कामगिरी केलीये. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडच्या मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला आणि तेंव्हापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता.
