
मुंबई : आज देशभरामध्ये ईद जोरदार साजरी होताना दिसत आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आज ईदच्या दिवशी चाहत्यांना खास आणि मोठे एक गिफ्ट दिले आहे. बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केली. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण (Pathaan) हा चित्रपट ठरलाय. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या यशानंतर लगेचच जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या याच पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने सर्व रेकाॅर्ड तोडले आहेत. शाहरुख खान याच्या चित्रपटाने बाहुबली चित्रपटाला रेकाॅर्ड तोडलाय.
विशेष म्हणजे फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने ओपनिंग डेलाच जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. सध्या शाहरुख खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
ईदनिमित्त शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. ईदनिमित्त शाहरुख खान याच्या मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर आज सकाळपासूनच चाहत्यांची मोठी गर्दी ही बघायला मिळत होती. शेवटी शाहरुख खान याने चाहत्यांना निराश न करता बंगल्याबाहेर येत शाहरुख खान हा चाहत्यांना भेटला आहे. शाहरुख खानने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
शाहरुख खान याला पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावताना दिसत नाहीये. शाहरुख खान याला पाहून चाहते उत्साही झाले. आता शाहरुख खान याचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी शाहरुख खान हा पांढऱ्या रंगाच्या टिशर्टमध्ये दिसत आहे. एकप्रकारे शाहरुख खान याने चाहत्यांना गिफ्टचे दिले आहे. काही दिवसांमध्ये शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. डंकीनंतर लगेचच शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. जवान चित्रपटांच्या सेटवरील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते.