Aryan Khan : मुहूर्त ठरला! शाहरुखचा मुलगा आर्यन लवकरच बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू, करण जोहर आर्यनला लाँच करणार?

लहानपणापासून फिल्म इंडस्ट्रीला जवळून पाहणाऱ्या आर्यनने आपल्या वेब सीरिजसाठी बॉलिवूडमधील एका स्ट्रगलरची कथा लिहिली आहे आणि सध्या त्याची स्क्रिप्ट तयार करण्यात व्यस्त आहे. त्याची स्टोरी कॉमिक असेल.

Aryan Khan : मुहूर्त ठरला! शाहरुखचा मुलगा आर्यन लवकरच बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू, करण जोहर आर्यनला लाँच करणार?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 15, 2022 | 10:56 AM

मुंबई : बॉलीवूडमधील (Bollywood) घराणेशाहीला प्रेक्षकांकडून कडाडूनविरोधात होताना दिसतोयं. त्यातच आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) पुढील वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. 2023 मध्ये आर्यन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे. तो चित्रपट आणि ओटीटीच्या (OTT) दुनियेत पाऊल ठेवणार आहे. बॉलीवूडमधील घराणेशाहीला प्रेक्षक आता कशाप्रकारे पुढे विरोध करतात हे बघण्यासारखे ठरणार आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात सिनेमाचे शिक्षण घेतलेला आर्यन बॉलिवूडमध्ये अभिनय करताना दिसणार असल्याची चर्चा होती.

बॉलिवूडमध्ये संघर्ष करणाऱ्या एका तरुणाची स्टोरी

लहानपणापासून फिल्म इंडस्ट्रीला जवळून पाहणाऱ्या आर्यनने आपल्या वेब सीरिजसाठी बॉलिवूडमधील एका स्ट्रगलरची कथा लिहिली आहे आणि सध्या त्याची स्क्रिप्ट तयार करण्यात व्यस्त आहे. त्याची स्टोरी कॉमिक असेल. या स्टोरीत बॉलिवूडमध्ये संघर्ष करणारा एक तरुण अभिनेता त्याच्या सहकाऱ्यांना चित्रपट उद्योग कसा चालतो आणि येथे काय घडते हे सांगताना दिसणार आहे.

हे सुद्धा वाचा

आर्यन खानला करण जोहर लॉन्च करणार ?

विशेष म्हणजे या वेब सिरीजमध्ये सिनेतारकांची जीवनशैली अगदी जवळून दाखवण्यात येणार आहे. आर्यन आणि त्याची टीम स्क्रिप्ट लॉक करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्याचे शूटिंग 2023 च्या सुरुवातीला सुरू होईल. बॉलीवूडच्या स्टार किड्सना लाँच करत घराणेशाहीचा झेंडा कायम ठेवण्यात आघाडीवर असलेला करण जोहर शाहरुखच्या मुलाला बाॅलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, जून 2022 मध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने आर्यनला एका चित्रपटासाठी साइन केले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें