AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सोनू सूदने आईच्या नावाने बनवला रस्ता, रात्री अडीच वाजता केली रस्त्याची पाहणी!

सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या कुठल्याही मुलाखतीमध्ये त्याच्या आईचे नाव घेतल्याशिवाय राहत नाही.

Video : सोनू सूदने आईच्या नावाने बनवला रस्ता, रात्री अडीच वाजता केली रस्त्याची पाहणी!
| Updated on: Feb 17, 2021 | 3:46 PM
Share

मुंबई : सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या कुठल्याही मुलाखतीमध्ये त्याच्या आईचे नाव घेतल्याशिवाय राहत नाही. कोरोना काळात सोनूने प्रत्येकाला मदत केली आहे. लहानपणी सोनू ज्या रस्त्यावर खेळला त्या रस्त्याला सोनूने त्याचा आईचे नाव दिले आहे. याची माहिती सोनूने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे. पोस्ट शेअर करताना सोनूने लिहिले होते की, हे माझ्या आयुष्यातील सर्वात खास ठिकाणांपैकी एक आहे. (Sonu Sood shared the video and informed the fans)

या रस्त्याचे नाव प्रोफेसर सरोज सूद असे आहे. मी आयुष्यभर या रस्त्यावर चाललो आहे. माझे घर त्या बाजूला आहे आणि मी याच रस्त्याने नेहमी शाळेत जात होतो. मीच नाहीतर माझे वडील आणि आईसुद्धा या रस्त्याने जात होते. माझ्या आयुष्यातील हा एक खास क्षण आहे. रात्रीचे अडीच वाजले आहेत आणि मी माझ्या घरी जात आहे.

काही दिवसांपूर्वी बासू गुप्ता नावाच्या एका तरूणाने सोनू सूदला ट्विटर करून म्हटंले होते की, ‘सोनू सूद सर, आमच्या गावात लंगूर माकडाने डझनभर लोकांना जखमी केले आहे आणि गावामध्ये त्या माकडाची दहशत निर्माण झाली आहे तरी तुम्ही काहीही करून आमच्या गावापासून दूर जंगलात त्या माकडाला पाठवा, माझी विनंती आहे.

या ट्विटरवर उत्तर देताना सोनू सूदने लिहिले होते की, आता हे माकड पकडायचे काम राहिले होते, आता ते पण करून पाहतो मित्रा… पत्ता पाठवा…सोनू सूदच्या या भन्नाट उत्तरानंतर एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे खरोखरच आता सोनू सूद माकड पकडण्यासाठी जाणार का? आणि सोनू सूदने जे बोलले ते खरं करून दाखवल. सोनूने त्या गावातील ते माकड पकडून दाखवल्याचे एक ट्विट करून सोनू सूदने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, बघा आता माकडही पकडलं आहे, बोला…

संबंधित बातम्या : 

अंकिताची पूलमध्ये धमाल, फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांचा चढला पारा!

अमिताभ बच्चन यांची नात नव्याने घेतला करिअर संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय!

Video : ‘धाकड’ चं शूटिंग संपताच कंगना निघाली शॉपिंगला, खरेदी केला हा खास ‘आयटम’

(Sonu Sood shared the video and informed the fans)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.