Video : ‘धाकड’ चं शूटिंग संपताच कंगना निघाली शॉपिंगला, खरेदी केला हा खास ‘आयटम’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

Video : 'धाकड' चं शूटिंग संपताच कंगना निघाली शॉपिंगला, खरेदी केला हा खास 'आयटम'

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. कोरोना काळातही घरी राहून ती चर्चेत होती. कंगना नेहमीच काहीतरी वादग्रस्त ट्विट करत असते. कंगना सध्या धाकड चित्रपटाची शूटिंग मध्येप्रदेशमध्ये करत असून शूटिंग शिफ्ट संपल्यानंतर बैतूल शहरामध्ये चक्क खरेदी करण्यासाठी कंगना बाहेर पडली होती. (After the shooting shift of the movie ‘Dhaakad ‘Kangana Ranaut went shopping)

यावेळी कंगना मातीचे भांडे खरेदी करताना दिसली आहे. मातीचे भांडे खरेदी करताना ती एका लहान मुलाला त्या बद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. तिचा हो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या फॅन्स पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ट्विटवर हा व्हिडीओ कंगनाने रिट्विट करत म्हटंले आहे की, शेवटी नाईट शिफ्ट संपली.

काल बैतूलमध्ये खरेदी करण्यासाठी गेले आणि बरीच सुंदर मातीचे भांडे विकत घेतले. मध्यप्रदेशचे कौतुक करण्यासारखे आणि प्रेम करण्याचे बरेच काही इथे आहे. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्यांची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे.

कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करत आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. यापूर्वी कंगनाने पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटाचे शूट मध्यप्रदेशमध्ये केले आहे. आता ती तिसऱ्यांदा भोपाळमध्ये शूटिंग करत आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीनंतर कंगनाने सांगितले आहे की, मध्यप्रदेशमध्ये धाकड चित्रपट करमुक्त होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

Video : नेहा कक्करच्या पतीचा ऑन स्टेज रोमान्स, असं गाणं गायलं की केला प्रेमाचा वर्षाव!

Aashram : प्रकाश झा यांना मोठा दिलासा, राजस्थान हायकोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय

Sandeep Nahar Suicide Case | मुंबई पोलिसांनी संदीप नहारच्या हत्येची शक्यता फेटाळली

(After the shooting shift of the movie ‘Dhaakad ‘Kangana Ranaut went shopping)

Published On - 10:45 am, Wed, 17 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI