Jai Bhim : वाढदिवसाच्या निमित्तानं दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानं चाहत्यांना दिली खास भेट, शेअर केला ‘जयभीम’चा फर्स्ट लूक

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 25, 2021 | 3:10 PM

सूर्या या चित्रपटात एका वकीलाची भूमिका साकारणार असल्याचं पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे. (Southern actor Suriya shared 'Jai Bhim's first look)

Jai Bhim : वाढदिवसाच्या निमित्तानं दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानं चाहत्यांना दिली खास भेट, शेअर केला 'जयभीम'चा फर्स्ट लूक

मुंबई : वाढदिवसाच्या निमित्तानं (Birthday Special) दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानं (Tamil actor Suriya ) ट्विटरवर आपल्या आगामी चित्रपट ‘जय भीम’चा (Jai Bhim) पहिला लुक शेअर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याला वकिलाच्या रुपात पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. अभिनेत्यानं शुक्रवारी (23 जुलै) आपल्या ट्विटरवर त्याच्या नव्या चित्रपटाचं रूप दाखवणारे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, “# जयभीम ‘चा फर्स्ट लूक शेअर करण्यास उत्साहित”.

चित्रपटात साकारणार वकीलाची भूमिका 

सूर्या या चित्रपटात एका वकीलाची भूमिका साकारणार असल्याचं पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टी.एस. ज्ञानवेल यांनी केलं असून सूर्याशिवाय रशिशा विजयन आणि माणिकंदन मुख्य भूमिकेत आहेत.

पाहा ट्विट

काल या अभिनेत्यानं पंडिराज दिग्दर्शित त्याच्या आगामी ‘एथरमकुम थुनिधवन’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. सूर्याचा हा 40 वा सिनेमा असेल. त्याचे शेवटचे दोन चित्रपट होते ‘पसंगा 2’ आणि ‘कडायकट्टी सिंगम’. त्याचा पुढील प्रकल्प ‘नवरसा’ हा असणार आहे. जो मणिरत्नम निर्मित आहे आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

शुक्रवार (23 जुलै) रोजी 46 वर्षांचा झालेला सूर्या तामिळ चित्रपट अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे. त्याला एक छोटा भाऊ आहे ज्याचं नाव कार्ती आहे. तो सुद्धा शोबिजमध्येही आहे. त्यानं 2006 मध्ये अभिनेत्री ज्योतिकाशी लग्न केलं होतं. (Southern actor Suriya gives special gift to fans on the occasion of his birthday, shared ‘Jai Bhim’s first look)

संबंधित बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘बबिता’ने मालिका सोडली ही केवळ अफवाच! ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण

Khoya Khoya Chand | फिल्म इंडस्ट्रीचा निरोप घेऊन राजकारणात प्रवेश, आता कर्करोगाशी झुंज देतेय अभिनेत्री किरण खेर

ज्या महागड्या लिपस्टिकमुळे आला होता चोरीचा आळ, त्याच ब्रँडने प्रोडक्ट लाँचची विनंती केली! वाचा अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा किस्सा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI