ज्या महागड्या लिपस्टिकमुळे आला होता चोरीचा आळ, त्याच ब्रँडने प्रोडक्ट लाँचची विनंती केली! वाचा अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा किस्सा

अभिनेत्री उर्मिला सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अनेक किस्से आणि गोष्टी देखील शेअर करत असते.

ज्या महागड्या लिपस्टिकमुळे आला होता चोरीचा आळ, त्याच ब्रँडने प्रोडक्ट लाँचची विनंती केली! वाचा अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा किस्सा
उर्मिला निंबाळकर
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 4:05 PM

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) सध्या तिच्या गर्भारपण आनंद लुटत आहे. अभिनेत्री उर्मिला सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अनेक किस्से आणि गोष्टी देखील शेअर करत असते. नुकताच आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा किस्सा अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात उर्मिलाने बराच संघर्ष केला. एके काळी ती ज्या मालिकेत काम करत होती, त्या मालिकेच्या नायिकेचा मेकअप चोरीला गेल्यावर केवल उर्मिलाकडे महागडी लिपस्टिक दिसल्याने तिच्यावर संशय घेण्यात आला होता. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस जेव्हा उर्मिलाला तिच्या याच आवडत्या लिपस्टिक ब्रँडने त्यांच्या नव्या प्रोडक्टचं खास लाँचिंग करण्याची विनंती केली.

काय म्हणाली उर्मिला?

‘तर झालं असं…एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर, त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायरची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी @maccosmeticsindia ची एक लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रॅंडेड आणि माझा ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्तेकच शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली.’

बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही!

‘माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात. माझ्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय. कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी 2 बस आणि 2 लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ऑडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतीय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिक मुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला.’

हा प्रवास माझ्यासाठी अभिमानाचा!

‘परवा @maccosmeticsindia चा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॅांच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता. आपल्या आवडत्या ब्रॅंडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच. पण, माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो!’, असं उर्मिला निंबाळकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.

पाहा पोस्ट :

उर्मिलाची कारकीर्द

मराठीसह हिंदी मालिका विश्वात चमकणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आता युट्युबर म्हणून देखील प्रसिद्ध झाली आहे. उर्मिलाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या प्रत्येक भूमिकेतून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. ‘दुहेरी’ या मालिकेत तिने ‘मैथिली’ ही प्रमुख भूमिका केली होती. तसंच, तिने ‘दिया और बाती हम’, ’मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकांमध्येही काम केले आहे. याबरोबरच तिने संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी देखील उत्तम पेलली.

(Actress Urmila Nimbalkar share her throwback experience about mac lipstick on social media)

हेही वाचा :

सलमान आणि यूलिया वंतूरची अशी झाली पहिली भेट, आता लग्नाच्या चर्चेला उधाण

जेव्हा रडणाऱ्या अमिताभ बच्चन यांना मेहमूद प्रोत्साहन देतात… वाचा ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटाचा मजेशीर किस्सा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.