Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘बबिता’ने मालिका सोडली ही केवळ अफवाच! ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका बर्‍याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक पात्राने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘बबिता’ने मालिका सोडली ही केवळ अफवाच! ‘तारक मेहता...’च्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण
मुनमुन दत्ता

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका बर्‍याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक पात्राने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्व पात्रांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. अलीकडेच या शोमध्ये ‘बबिता जीं’ची भूमिका साकारणार्‍या मुनमुन दत्ताने (Munmun Dutta) हा शो सोडल्याच्या बातम्या आल्या समोर आल्या होत्या. मात्र, आता ही बातमी निर्मात्यांनी नाकारली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ‘नीला टेली फिल्म प्रॉडक्शन’च्या अंतर्गत बनत आहे. शोच्या निर्मात्याने सांगितले की, मुनमुन दत्ताने हा शो सोडल्याची बातमी चुकीची आहे. चित्रपटाचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ईटाइम्सशी खास संवाद साधला. त्यांनी म्हटले आहे की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये मुनमुन दत्ता ‘बबिता जीं’च्या भूमिकेत दिसणार आहे. तिने हा शो सोडल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे.’

शो सोडल्याची बातमी

स्पॉटबॉयच्या अहवालानुसार ट्रोल झाल्यापासून मुनमुन दत्ता मालिकेच्या सेटवर दिसली नाही. या शोमध्ये तिच्यासाठी कोणतीही कथा लिहिलेली जात नाहीय. ज्यामुळे तिने या शोला निरोप दिल्याची बातमी चर्चेत आली होती.

मुनमुन दत्ता ट्रोल

मुनमुनने काही दिवसांपूर्वी एक मेकअप ट्यूटोरियल व्हिडीओ सामायिक केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली होती की, मी लवकरच यूट्यूबवर पदार्पण करेन आणि यासाठी मला चांगले दिसायचे आहे. या दरम्यान मुनमुनने जातीवाचक अपशब्दाचा वापर केला होता. मुनमुनचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते.

त्यानंतर बर्‍याच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या अभिनेत्रीविरोधात संताप व्यक्त करत, तिला अटक करण्याची मागणी केली होती. मुनमुनविरोधात ज्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते सर्व कलम अजामीनपात्र आहेत आणि या कलमांमध्ये अटकपूर्व जामिनाची देखील तरतूद नाही.

अभिनेत्रीने मागितली माफी

आपली चूक लक्षात येताच मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मुनमुनने आपल्या निवेदनात लिहिले होते की, ‘हे मी काल पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या संदर्भात आहे. जिथे मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. माझा कधीच एखाद्याच्या भावना दुखावणे, धमकावणे किंवा इतर कोणता असा हेतू नव्हता. मर्यादित भाषेच्या ज्ञानामुळे, मी त्या शब्दाचा अर्थ माहित नसतान देखील वापरला.’

(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah producer denied munmun dutta’s exit from serial)

हेही वाचा :

शिल्पा म्हणते पॉर्न नाही इरॉटीक फिल्म्स बनवतो नवरा, मग दोन्ही फरक काय असतो?

Bigg Boss OTT | सलमान खान नाही तर करण जोहर होस्ट करणार ‘बिग बॉस ओटीटी’, जाणून घ्या नेमकं काय बदलणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI