Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘बबिता जीं’ची मालिकेतून एक्झिट? सेटवर मुनमुन दत्ताच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण!

गेल्या काही दिवसांपासून मुनमुन दत्ता सेटवरून गायब असून, कित्येक दिवसांपासून मालिकेत तिच्यासाठी कथानक लिहिले जात नाहीय.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘बबिता जीं’ची मालिकेतून एक्झिट? सेटवर मुनमुन दत्ताच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण!
मुनमुन दत्ता

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेने गेल्या बर्‍याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. मग, ते ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे दिलीप जोशी असो वा, ‘बबिता जी’ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता असो. अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही बर्‍याच काळापासून मुख्य बातम्यांचा एक भाग बनली होता. पण आता ती गेल्या काही दिवसांपासून सेटवरून गायब आहे.

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना साथीच्या आजारामुळे हा सेट सध्या मुंबईहून दमण येथे हलवण्यात आला होता. आता मुंबईत पुन्हा शुटिंगला सुरुवात झाली असून, गेल्या एक महिन्यापासून या टीमचे मुंबईत शूटिंग सुरू आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुनमुन दत्ता सेटवरून गायब असून, कित्येक दिवसांपासून मालिकेत तिच्यासाठी कथानक लिहिले जात नाहीय.

 ‘बबिता जीं’ची मालिकेतून एक्झिट?

स्पॉटबॉयच्या अहवालानुसार मुनमुन दत्ता वादामुळे चर्चेत आल्यापासून सेटवर आली नव्हती. मुनमुन दत्ता हिने आपल्या एका व्हिडीओमध्ये जातीयवादी शब्द वापरला होता, ज्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने या शोला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे.

जेव्हा मुनमुनला शो सोडण्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा ती उपलब्धच नव्हती. आता मुनमुनने हा शो सोडला आहे की नाही, हे केवळ निर्माता किंवा अभिनेत्री स्वत:च सांगू शकतात.

काय होते प्रकरण?

मुनमुनने काही दिवसांपूर्वी एक मेकअप ट्यूटोरियल व्हिडीओ सामायिक केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली होती की, मी लवकरच यूट्यूबवर पदार्पण करेन आणि यासाठी मला चांगले दिसायचे आहे. या दरम्यान मुनमुनने जातीवाचक अपशब्दाचा वापर केला होता. मुनमुनचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते.

त्यानंतर बर्‍याच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या अभिनेत्रीविरोधात संताप व्यक्त करत, तिला अटक करण्याची मागणी केली होती. मुनमुनविरोधात ज्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते सर्व कलम अजामीनपात्र आहेत आणि या कलमांमध्ये अटकपूर्व जामिनाची देखील तरतूद नाही.

अभिनेत्रीने मागितली माफी

आपली चूक लक्षात येताच मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मुनमुनने आपल्या निवेदनात लिहिले होते की, ‘हे मी काल पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या संदर्भात आहे. जिथे मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. माझा कधीच एखाद्याच्या भावना दुखावणे, धमकावणे किंवा इतर कोणता असा हेतू नव्हता. मर्यादित भाषेच्या ज्ञानामुळे, मी त्या शब्दाचा अर्थ माहित नसतान देखील वापरला.’

(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Munmun Dutta quits the show)

हेही वाचा :

Hungama 2 | ‘हंगामा 2’द्वारे तब्बल 8 वर्षानंतर प्रियदर्शन यांचं कमबॅक, एक नजर त्यांच्या सुपरहिट विनोदी चित्रपटांवर!

Umesh Kamat | राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, अभिनेता उमेश कामतकडून कारवाईचा इशारा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI