AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जेव्हा सुशांतने होळीच्या दिवशी जॅकलीन-अंकितासोबत लगावले होते ठुमके, चाहत्यांनी शेअर केल्या आठवणी!

सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा जुना होळी व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस ‘सिलसिला’ या चित्रपटाच्या सुपरहिट गाणे ‘रंग बरसे’वर ठुमके लगावताना दिसत आहेत.

Video | जेव्हा सुशांतने होळीच्या दिवशी जॅकलीन-अंकितासोबत लगावले होते ठुमके, चाहत्यांनी शेअर केल्या आठवणी!
सुशांत सिंह राजपूत होळी
| Updated on: Mar 29, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई : गेल्या वर्षी जूनमध्ये बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने या जगाला निरोप दिला होता. आज सुशांत सिंह राजपूत या जगात नसला तरी त्याचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या लाडक्या अभिनेत्याच्या आठवणी जाग्या ठेवत आहेत. होळीच्या खास निमित्ताने सुशांतचा एक थ्रोबॅक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे (Sushant Singh Rajput Fans Share Late actors throwback holi video).

वास्तविक, सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा जुना होळी व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस ‘सिलसिला’ या चित्रपटाच्या सुपरहिट गाणे ‘रंग बरसे’वर ठुमके लगावताना दिसत आहेत. सुशांत आणि जॅकलिनचा सध्या चर्चित असलेला हा थ्रोबॅक व्हिडीओ मुंबईत आयोजित झालेल्या एका होळी पार्टी दरम्यानचा आहे.

बऱ्याच वर्षांपासून होती होळी खेळण्याची इच्छा!

View this post on Instagram

A post shared by blogger (@blogger_1984)

अभिनेता सुशांत आणि जॅकलिन ‘ड्राईव्ह’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर हवी तितकी जादू दाखवता आली नाही, पण सुशांतची डॅशिंग स्टाईल त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली. या पार्टीत सुशांतने सांगितले होते की, आपल्याला या होळी पार्टीत बर्‍याच दिवसांपासून यायचे आहे पण, ती संधी त्याला आता मिळाली आहे (Sushant Singh Rajput Fans Share Late actors throwback holi video).

अंकितासोबत सुशांतचे ठुमके

View this post on Instagram

A post shared by blogger (@blogger_1984)

जॅकलिनच नव्हे तर, सुशांतचा अंकिता लोखंडेसोबतचा एक होळी व्हिडीओ देखील सध्या चर्चेत आला आहे. एका छोट्या व्हिडीओ क्लिपमध्ये सुशांत अंकिताबरोबर हसत होळी खेळत होता. सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता बर्‍याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर ते दोघे वेगळे झाले. अंकितापासून वेगेळे झाल्यानंतर सुशांत रिया चक्रवर्तीशी नात्यात होता.

सुशांतचा चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट

मुंबईतील राहत्या घरी 14 जून 2020 रोजी गळफास घेऊन आत्महत्या करत, सुशांतने आपले आयुष्य संपवले होते. मृत्युनंतर सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. सुशांत सिंग राजपूत अभिनित ‘छिछोरे’ या चित्रपटाला 67व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या चित्रपटात सुशांतसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता वरुण शर्मा आणि ताहिर राज भसीन हे कलाकार झळकले होते. ‘छिछोरे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.

(Sushant Singh Rajput Fans Share Late actors throwback holi video)

हेही वाचा :

महाराष्ट्रातील ‘नाईट कर्फ्यू’चा ‘सायना’च्या कमाईवर परिणाम! बिग बींचा ‘चेहरे’ लांबणीवर पडणार?

राधिका आपटेने शेअर केला ‘Mrs. undercover’चं पोस्टर, नवरीच्या कमरेला चक्क रिव्हॉल्वर!

Follow Us
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....