Birth Anniversary | दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतचे स्वप्न पूर्ण करणार!

सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जाऊन आता आठ महिने उलटले आहेत. मात्र, त्याच्या चाहत्यांच्या मनात आजही सुशांत जिवंत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:47 AM, 21 Jan 2021
Birth Anniversary | दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतचे स्वप्न पूर्ण करणार!

मुंबई : सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जाऊन आता आठ महिने उलटले आहेत. मात्र, त्याच्या चाहत्यांच्या मनात आजही सुशांत जिवंत आहे. आज सुशांतचा 35 वाढदिवस आहे. सुशांतने 14 जूनला जगाचा निरोप घेतला. सुशांतने त्याच्या डायरीत लिहिलेली अनेक स्वप्ने अजून पूर्ण झालेली नाहीत. आज सुशांतच्या वाढदिवसानिमित्त केदारनाथचे दिग्दर्शक आणि सुशांतचे खास मित्र अभिषेक कपूर यांनी त्यांचे एक स्वप्न पूर्ण केले.टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अभिषेक कपूर आणि त्यांची पत्नी प्रज्ञा यांनी सुशांतचे एक स्वप्नपूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. (Sushant Singh Rajput’s wish will be fulfilled today)

सुशांतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आजचा दिवस निवडला आहे. त्यांनी सुशांतच्या वाढदिवशी झाडे लावण्याचे नियोजन केले असून ते आज 1000 झाडे लावणार आहेत.
प्रज्ञा बॉम्बे टाईम्सशी बोलताना म्हणाल्या होत्या की, सुशांतची कोणतीही इच्छा अपूर्ण राहू नये. सुशांतने बरीच स्वप्ने बघितली होती. आम्ही प्रत्येक स्वप्न तर पूर्ण करू शकत नाही परंतु आम्ही 1000 झाडे लावणार आहोत.

सुशांतने 2008 मध्ये त्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. ‘किस देस में है मेरा दिल’ या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर सुशांत पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला. सुशांतच्या करिअरमध्ये हा त्याचा टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे त्याला एक ओळख मिळाली.

टीव्हीवर घवघवीत यश मिळवल्यानंतर सुशांतने 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा पहिला सिनेमा ‘काय पो चे’ होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. 2016 मध्ये सुशांतचा ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट ठरला. त्यानंतर त्याने ‘केदारनाथ’, ‘सोनचिडिया’, ‘छिछोरे’ आणि ‘ड्राईव्ह’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. त्याचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ होता

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput | ‘परत ये….’, सुशांतच्या वाढदिवशी चाहते भावूक

कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स

(Sushant Singh Rajput’s wish will be fulfilled today)