Sushant Singh Rajput | ‘परत ये….’, सुशांतच्या वाढदिवशी चाहते भावूक

आज सुशांतचा 35 वाढदिवस आहे. याप्रसंगी त्याचे चाहते सोशल मीडियावर भावूक होताना दिसले.

Sushant Singh Rajput | 'परत ये....', सुशांतच्या वाढदिवशी चाहते भावूक
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जूनला मुंबईतील त्याच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली याचा शोध घेण्यात सीबीआय, एनसीबी आणि ईडी गुंतले आहेत.
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 8:29 AM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत याला जाऊन आता आठ महिने उलटले आहेत (Sushant Singh Rajput Birth Anniversary). मात्र, त्याच्या चाहत्यांच्या मनात आजही तो जिवंत आहे. आज सुशांतचा 35 वाढदिवस आहे. याप्रसंगी त्याचे चाहते सोशल मीडियावर भावूक होताना दिसले. ‘सुशांत तू परत ये’, असं चाहते म्हणत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला न्याय मिळवून देण्याची वारंवार मागणी केली (Sushant Singh Rajput Birth Anniversary).

सुशांतच्या जगभरातील चाहत्यांकडून आजच्या दिवशी ट्विट करण्यात येत आहे. एका युझरने लिहिलं – ‘परत ये, या जगाला तुझी गरज आहे’… तर कुणी त्याच्यासाठी तयार करण्यात आलेला म्युझिकल ट्रिब्युट व्हिडीओ शेअर केला.

एका युझरने लिहिलं – 21 जानेवारी… बॉलिवूडच्या इतिहासात कुठल्या अभिनेत्याच्या वाढदिवसासाठी इतकी उत्सुकता कधीही पाहायला मिळाली नाही. तर कुणी लिहिले की- नेहमी प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद…

श्वेता सिंह किर्तीला भावाची आठवण

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने भावाच्या नावे ट्विट केलं. तिने सुशांत आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर केले. “लव्ह यु भाई! तू माझा भाग आहेस आणि कायमच राहाशील… #SushantDay”

सुशांतचा मृत्यू

पवित्र रिश्ता मालिकेतील ‘मानव’ आणि बॉलिवूडमधील अनेक सिनेमामंधील उत्कृष्ट अभिनयाने देशातील नागरिकांच्या मनात स्थान मिळवलेला सुशांत 14 जून 2020 च्या सकाळी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण देश हळहळला. 34 वर्षीय सुशांत वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आला. प्रथमदर्शनी सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं.

पण, सुशांतच्या कुटुंबाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर या घटनेला वेगळं वळण मिळालं. सुशांतच्या घरच्यांनी त्याच्या मृत्यूसाठी थेट अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप लावला. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सध्या 145 दिवसांच्या तपासानंतरही सीबीआय सुशांतच्या मृत्यूबाबत ठोस अहवाल देऊ शकलेली नाही (Sushant Singh Rajput Birthday).

सुशांतची कारकीर्द

सुशांतने 2008 मध्ये त्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. ‘किस देस में है मेरा दिल’ या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर सुशांत पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला. सुशांतच्या करिअरमध्ये हा त्याचा टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे त्याला एक ओळख मिळाली.

टीव्हीवर घवघवीत यश मिळवल्यानंतर सुशांतने 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा पहिला सिनेमा ‘काय पो चे’ होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. 2016 मध्ये सुशांतचा ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट ठरला. त्यानंतर त्याने ‘केदारनाथ’, ‘सोनचिडिया’, ‘छिछोरे’ आणि ‘ड्राईव्ह’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. त्याचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ होता (Sushant Singh Rajput Birth Anniversary).

संबंधित बातम्या :

Special Story | पालघर मॉब लिंचिंग, हाथरसपासून ते सुशांतसिंह आत्महत्याप्रकरण… 2020मधील ‘या’ घटनांनी संपूर्ण देश हादरवला!

SSR Case | सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींची अडचण कायम, कोर्टानं निकाल राखीव ठेवला

अजूनही रियाचं सुशांतवर प्रेम, Love is Power म्हणत टीकाकारांना खास उत्तर

Bollywood | इरफान-सुशांत-सरोज खान, 2020मध्ये बॉलिवूडने गमावले ‘हे’ दिग्गज तारे!

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.