AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘द काश्मीर फाइल्स’ पाहून प्रेक्षक ढसाढसा रडले; थिएटरमधील व्हिडीओ आला समोर

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन जोशी आणि पल्लवी जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी विवेक अग्निहोत्रींचं ट्विट रिट्विट केलं आहे.

Video: 'द काश्मीर फाइल्स' पाहून प्रेक्षक ढसाढसा रडले; थिएटरमधील व्हिडीओ आला समोर
The Kasmir FilesImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 06, 2022 | 11:37 AM
Share

काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) विस्थापनावर बनलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग नुकतंच जम्मूमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. हा चित्रपट संपल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू पहायला मिळाले. सोशल मीडियावर या स्पेशल स्क्रीनिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चित्रपट पाहिल्यानंतर या महिला भावूक झाल्याचं दिसत आहेत. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन जोशी आणि पल्लवी जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी विवेक अग्निहोत्रींचं ट्विट रिट्विट केलं आहे. यामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचं पहायला मिळत आहे. ‘पॉवर ऑफ ट्रू सिनेमा’, असं गिरीश जोहर यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सत्य समोर येईल, असा दावा चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केला होता. काश्मीरच्या समस्येवरील निराकरणाला राजकारणाशी जोडून पाहणं चुकीचं ठरेल, असं ते म्हणाले. लोकशाहीत राजकारण हे व्होट बँकवर चालतं. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये पंडितांची व्होट बँक नाही, त्यामुळे कदाचित त्या समस्येचं निराकरण होऊ शकलं नाही, असं ते जम्मूमध्ये म्हणाले.

विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केली लोकांची प्रतिक्रिया

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरून काही व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यात ते प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया दाखवत आहेत. एक व्हिडिओ शेअर करत अग्निहोत्री यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘खचलेले लोक बोलत नाहीत, त्यांचं ऐकून घेतलं जातं’. विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची लोकप्रियता खूप वाढल्याचं सांगितलं होतं. IMDb च्या रिअल टाइममध्ये काश्मीर फाइल्सला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.

हेही वाचा:

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.