
भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यांनी लग्न केले. विराट आणि अनुष्का शर्मा यांनी विदेशात लग्न केले. 2018 मध्ये अनुष्का शर्मा हिचा झिरो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. शेवटी झिरो चित्रपटात ती दिसली. मात्र, तो चित्रपट फ्लॉप गेला. अनुष्का शर्मा ही 2018 नंतर चित्रपटात दिसली नाही. अनुष्का शर्मा ही जरी चित्रपटांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. अनुष्का शर्मा ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आपल्या खासगी आयुष्याबद्दलही अपडेट देताना दिसते.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे विदेशात शिफ्ट झाल्याचे सांगितले जाते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीचे नाव वामिका आहे. काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये अनुष्का शर्मा हिने मुलाला जन्म दिलाय. अनुष्का शर्मा आणि विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे आपल्या मुलांना कॅमेऱ्यापासून कायमच दूर ठेवतात.
काही दिवसांपूर्वीच वामिका हिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसला. आता अनुष्का शर्मा आणि विराट यांचा मुलगा अकाय याची एक झलक बघायला मिळतंय. अनुष्का शर्मा हिने एक फोटो शेअर केलाय. त्यामध्ये अकायची झलक बघायला मिळतंय. अनुष्का शर्मा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये बरेच साहित्य ठेवल्याचे बघायला मिळतंय. एका बाऊलमध्ये काकडी आणि गाजर ठेवल्याचे दिसतंय. तेच घेण्यासाठी अकाय घेताना दिसतोय. अनुष्का शर्मा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये अकाय याचा हात दिसतोय. आता अनुष्का शर्मा हिने शेअर केलेला हाच फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
अनुष्का शर्मा किंवा विराट कोहली यांनी एकही झलक अकाय याची दाखवली नव्हती. आता अनुष्का शर्मा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये अकायची एक छोटीशी झलक दिसत आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी फेब्रुवारीमध्ये आपल्या लेकाचे स्वागत केले. त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मुलाच्या नावाची घोषणा देखील केली. T20 सामना जिंकल्यानंतर अनुष्का शर्मा हिला भेटण्यासाठी विराट कोहली हा भारतामधून लंडनला रवाना झालाय. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कुटुंबासोबत चांगला वेळ घालताना दिसत आहेत.