Sridevi | मृत्यूपूर्वीचा श्रीदेवी यांचा ‘तो’ फोटो; अखेर पाच वर्षांनंतर बोनी कपूर यांनी केला शेअर

| Updated on: Feb 24, 2023 | 8:04 AM

भाचा मोहीत मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. तिथे त्यांचे पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत एक फोटो क्लिक करण्यात आला होता. श्रीदेवी यांचं निधन बाथटबमध्ये बुडून झाल्याचं म्हटलं गेलं.

Sridevi | मृत्यूपूर्वीचा श्रीदेवी यांचा तो फोटो; अखेर पाच वर्षांनंतर बोनी कपूर यांनी केला शेअर
Sridevi
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : सेलिब्रिटींच्या सर्वांत धक्कादायक निधनापैकी एक म्हणजे सुपरस्टार श्रीदेवी यांचं निधन. असे असंख्य लोकप्रिय आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी होऊन गेले, ज्यांच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यापैकी एक होती बॉलिवूडची ‘चांदनी’ अर्थात श्रीदेवी. त्यांच्या निधनाने वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांचं निधन 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत झालं. त्या 54 वर्षांच्या होत्या. भाचा मोहीत मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. तिथे त्यांचे पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत एक फोटो क्लिक करण्यात आला होता. श्रीदेवी यांचं निधन बाथटबमध्ये बुडून झाल्याचं म्हटलं गेलं.

आता श्रीदेवी यांच्या पाचव्या पुण्यतिथीच्या आधी त्यांचे पती बोनू कपूर यांनी त्यांच्यासोबत क्लिक केलेला शेवटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रीदेवी त्यांचे पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूरसोबत दिसत आहेत. याशिवाय इतरही काही नातेवाईक पहायला मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

बोनी कपूर यांची भावनिक पोस्ट

बोनी कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. पत्नीचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं, ‘तू आम्हाला पाच वर्षांपूर्वी सोडून गेलीस. तुझं प्रेम आणि तुझ्या आठवणी आम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. त्या आठवणी नेहमीच आमच्यासोबत राहतील.’ यासोबतच त्यांनी श्रीदेवी यांचा एक फोटो पोस्ट केला होता. ‘जो चला गया मुझे छोडकर वो आजतक मेरे साथ है’, असं त्यांनी लिहिलं होतं.

पहा फोटो-

जान्हवीकडून आईच्या आठवणींना उजाळा

श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर अनेकदा मुलाखतींमध्ये आईबद्दल व्यक्त होताना दिसते. जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ प्रदर्शित होण्याआधीच श्रीदेवी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. “मी आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शोधते. तरीसुद्धा मी ते सर्व करते, ते तुम्ही करायच्या. मी तुम्हाला गौरवान्वित करत असेन, अशी मला आशा आहे”, असं तिने सोशल मीडियावर लिहिलं होतं.

80च्या दशकांत जेव्हा चित्रपट केवळ अभिनेत्याच्या जोरावर चालायचे, तेव्हा श्रीदेवी या एकमेव अभिनेत्री होत्या, ज्यांनी बड्या कलाकारांना टक्कर दिली. श्रीदेवी यांच्या नावाने प्रेक्षक स्वतः चित्रपटगृहांकडे ओढले जायचे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर एक असं स्थान निर्माण केलं, जे त्या काळात अभिनेत्रीसाठी बॉलिवूडमध्ये असणं फार कठीण होतं. याच कारणामुळे त्या काळात श्रीदेवी एका अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन आकारायच्या.