AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईचं प्रेम कोर्टाला कसं समजवू? मुलाच्या कबरीजवळ सेलिना जेटलीला अश्रू अनावर

सेलिना जेटलीने दिवंगत मुलगा शमशेरच्या आठवणीत एक अत्यंत भावूक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती त्याच्या कबरीजवळ अश्रू ढाळत होती. या व्हिडिओने चाहतेही भावूक झाले.

आईचं प्रेम कोर्टाला कसं समजवू? मुलाच्या कबरीजवळ सेलिना जेटलीला अश्रू अनावर
| Updated on: Sep 11, 2026 | 7:54 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) हिचं वैयक्तिक आयुष्य सध्या खूप चर्चेत आहे. तिचा आणि तिच्या पतीमधला लढा जगजाहीर आहे,तिने पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यांना तीन मुलं आहेत. पतीच्या अत्याचारामुळे ऑस्ट्रेलियातील घर सोडून भारतात परतावं लागल्याचा खुलासा सेलिनाने केला होता. ती सध्या मुलांच्या कस्टीसाठी देखील लढत आहे. त्यातच आता तिने तिचा दिवंगत मुलगा शमशेरच्या आठवणीत एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले. व्हिडिओमध्ये सेलिना आपल्या मुलाच्या कबरीजवळ बसलेल दिसत आहे. तिने कबरीवर फुले अर्पण केली पण ती तिच्या भावनांना आवर घालू शकली नाही. तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी एका आईच्या मनातील अपार वेदना आणि मुलाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी दाखवली.

शमशेरच्या वाढदिवशी आठवणींना उजाळा

शमशेरच्या वाढदिवसानिमित्त सेलिनाने हा भावनिक व्हिडिओ शेअर केला. शमशेर हा सेलिनाच्या जुळ्या मुलांपैकी एक होता. जन्मजात हृदयविकारामुळे जन्मानंतर काही काळातच त्याचे निधन झाले. आपल्या मुलाला गमावण्याचे दुःख सेलिनाच्या मनात आजही खुपतयं. सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमधून ती अनेकदा शमशेरच्या आठवणींना उजाळा देताना दिसते. व्हिडिओमध्ये सेलिना बराच वेळ मुलाच्या कबरीजवळ शांतपणे बसून राहिलेली दिसली. कबरीकडे पाहत असताना तिच्या भावनांचा बांध फुटला आणि ओक्साबोक्शी रडू लागली. काळ कितीही पुढे गेला तरी मुलाला गमावल्याचे दुःख एका आईच्या मनातून कधीच पूर्णपणे नाहीसे होत नाही, हेच तिच्या व्हिडीओतून दिसून आलं.

माझी शेवटची इच्छा…

या पोस्टसोबत सेलिनाने आपल्या मनातील एक हळवी इच्छा देखील व्यक्त केली आहे. आयुष्याच्या अखेरीस माझ्या अस्थी मुलगा शमशेरच्या जवळ ठेवण्यात याव्यात, अशी तिची इच्छा आहे. आपल्या मुलाला पुरेसा वेळ जवळ घेता आलं नाही, त्याच्यासोबत आयुष्य जगता आले नाही, याची वेदना तिच्या शब्दांतून स्पष्ट जाणवते.

सेलिनाने आपल्या पोस्टमध्ये आईच्या प्रेमाबद्दलही भावनिक प्रश्न उपस्थित केला आहे. एका आईने, तिच्या मुलावर असलेलं प्रेम कोर्टासमोर कसं सिद्ध करता येईल, असा सवाल तिने केलाय. तिच्या या शब्दांनी चाहत्यांच्या मनाला चटका लावला. याचदरम्यान सेलिनाने तिच्या दोन्ही मुलांना—शमशेर आणि अर्थु—वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या जगात मुलांसोबत कितीही कमी काळ मिळाला असला तरी मी नेहमीच दोन्ही मुलांची आई राहीन, असंही तिने लिहीलं.

सेलिनाचा हा व्हिडिओ म्हणजे केवळ एका अभिनेत्रीची भावनिक पोस्ट नव्हे तर आपल्या मुलाला गमावलेल्या एका आईच्या मनातील वेदना त्यातून दिसतात. चाहत्यांनीही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत तिला धीर दिला. शमशेर सोबत नसला तरी तो तिच्या आठवणींमध्ये आणि हृदयात कायम जिवंत राहील, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?