वडापाव गर्ल आणि पायल मलिक हिने केली बिग बॉस ओटीटीच्या निर्मात्यांची पोलखोल, गंभीर आरोप करत…

बिग बॉस ओटीटी 3 धमाका करताना दिसत आहे. आता फिनालेला काही दिवसच शिल्लक आहेत. विशेष म्हणजे हे सीजन हीट ठरताना दिसतंय. अनिल कपूर हे बिग बॉस ओटीटी 3 ला होस्ट करत आहेत. आता नुकताच वडापाव गर्ल आणि पायल मलिक यांच्याकडून काही गंभीर आरोप करण्यात आले.

वडापाव गर्ल आणि पायल मलिक हिने केली बिग बॉस ओटीटीच्या निर्मात्यांची पोलखोल, गंभीर आरोप करत...
Payal Malik and Chandrika Dixit
| Updated on: Jul 22, 2024 | 4:39 PM

बिग बॉस ओटीटी 3 धमाल करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. हे सीजन चांगलेच हीट होताना दिसत आहे. आता बिग बॉस ओटीटी 3 च्या फिनालेला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. विकेंडच्या वारनंतर घरातील तीन सदस्यांना कायमचा बाहेरचा रस्ता हा दाखवण्यात आलाय. यामुळेच शो चांगलाच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. गेल्याच आठवड्यात वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीये. अनिल कपूर यांनी चंद्रिका दीक्षित हिला म्हटले होते की, तुझा स्वत:चा घरात एकदी मुद्दा नाही, यामुळे तू नेहमीच दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये उडी मारते.

काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक याची पहिली पत्नी ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीये. मात्र, पायल ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आता नुकताच चंद्रिका दीक्षित हिला भेटण्यासाठी पायल मलिक ही दिल्लीला पोहोचली. चंद्रिका ही सतत पायलला भेटण्यासाठी बोलावत होती. आता चंद्रिका आणि पायल यांनी मोठी पोलखोल केल्याचे बघायला मिळतंय.

वडापाव गर्ल पायल मलिक हिला म्हणते की, तिथे बिग बॉसच्या घरात कपडे नाहीत म्हणताना अरमानजी दिसत आहेत. यावर पायल मलिक ही म्हणते की, मी गोलूसाठी आणि अरमानजी यांच्यासाठी किती जास्त कपडे पाठवत आहे. मात्र, ते कपडे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तिथे अरमानजीला वाटत आहे की, पायल का कपडे पाठवत नाहीये.

मी इतके जास्त पैसे खर्च करून कपडे पाठवत आहे आणि ते त्यांना मिळतच नाहीत. यावर वडापाव गर्लने हैराण करणारा खुलासा केला. वडापाव गर्ल म्हणाली की, मी ज्यावेळी बिग बॉसच्या घरात होते, त्यावेळी मी देखील चप्पल पाठवण्यास यशला सांगितले, पण माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही. मी ज्यावेळी घराच्या बाहेर आले, तेंव्हा यशने पाठवलेल्या चप्पल मला दिसल्या.

हेच नाहीतर वडापाव गर्ल पुढे म्हणाली की, अरमानजीचे कपडेही मला बाहेर दिसले. हे ऐकून पायल म्हणाली की, हे खूप जास्त चुकीचे आहे. वडापाव गर्लने म्हटले, घरातील इतर सदस्यांच्या वस्तू घरात येण्यास समस्या होतात फक्त सना मकबूल हिचेच कपडे वेळेवर येतात आणि तिला प्रत्येक गोष्ट दिली जाते. बिग बॉसच्या घरात भेदभाव होत असल्याचेही थेट वडापाव गर्लने म्हटले आहे.