समय रैनाला मोठा झटका, महाराष्ट्र सायबर सेलने फेटाळली ‘ही’ मागणी, पुन्हा होणार नुकसान?

'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमुळे समय रैना चांगलाच वादात सापडला आहे. त्याला 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सायबर सेलसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावे लागणार आहे. मात्र समयने याबाबत सायबर सेलकडे एक विनंती केली होती जी महाराष्ट्र सायबर सेलने फेटाळली आहे. त्यामुळे नक्कीच समयचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

समय रैनाला मोठा झटका, महाराष्ट्र सायबर सेलने फेटाळली ही मागणी, पुन्हा होणार नुकसान?
| Updated on: Feb 17, 2025 | 7:08 PM

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमुळे समय रैना चांगलाच वादात सापडला आहे. त्याला 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सायबर सेलसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र आता सायबर सेलच्या एका निर्णयामुळे समय रैनाची अडचणी वाढणार असून त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

समय रैनाला 18 फेब्रुवारी रोजी सायबर सेलसमोर हजर रहावे लागणार 

इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून समय रैना, त्याचा शो चांगलाच अडचणीत आले आहेत. समयने शोचे सर्व एपिसोडही यूट्यूबवरून काढून टाकले आहेत. त्याच्याविरुद्ध समन्सही जारी करण्यात आला आहे आणि त्याला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर सेलकडून बोलावण्यात आले आहे. समय रैनाला 18 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र समय सध्या भारतात नसून तो त्याचे शो करण्यासाठी अमेरिकेत आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय फेटाळला

त्यामुळे त्याने त्याचा जबाब व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्याची सायबर सेलकडे मागणी केली होती. मात्र सायबरने त्याची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आता त्याला 18 फेब्रुवारी रोजी सायबर विभागासमोर हजर राहावेच लागणार आहे. त्यामुळे त्याला शो रद्द करून किंवा पुढे ढकलून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं लागणार आहे. असं जर झालं तर मात्र त्याचं पुन्हा मोठं नुकसान होऊ शकतं.

शो रद्द करावा लागला तर मोठं नुकसान

त्याची विनंती फेटाळल्यानंतर आता तो जबाब नोंदवण्यासाठी भारतात येतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान त्याच्याविरुद्ध मुंबई तसेच गुवाहाटीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि 18 फेब्रुवारीला त्याला गुवाहाटी पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आले आहे.

आसाममध्येही गुन्हा दाखल 

आतापर्यंत सायबर सेलने या प्रकरणात 40 जणांना समन्स पाठवले आहेत. काही लोकांचे ईमेल चुकीचे आहेत, त्यामुळे सोशल मीडियाद्वारे अशा लोकांना समन्स पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अलिकडेच अभिनेता रघुराम यांचाही जबाब नोंदवण्यात आला. त्याने जबाबात म्हटलं होतं की, या सगळ्यामागे फक्त समय रैना आहे, जो ही सगळी भाषा ठरवतो.

या लोकांनाही बजावण्यात आला समन्स

समय रैनासोबत आशिष चंचलानी, अपूर्व मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया हे देखील वादात अडकले आहेत. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना जबाब देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. आशिष, अपूर्वा आणि रणवीर हे देखील समय रैनाच्या शोमध्ये जज म्हणून सामील झाले होते.