AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’च्या यशाबद्दल दीपिका पादुकोण गप्प का? अखेर स्वत:च दिलं उत्तर; ट्रोलरची बोलती केली बंद!

अभिनेत्री दीपिका पादुकोणने अखेर 'धुरंधर 2'वर प्रतिक्रिया न दिल्याने होणाऱ्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे. रणवीरच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल दीपिका इतके दिवस मौन बाळगून होती. आता तिने ट्रोलरला उत्तर दिलं आहे.

'धुरंधर 2'च्या यशाबद्दल दीपिका पादुकोण गप्प का? अखेर स्वत:च दिलं उत्तर; ट्रोलरची बोलती केली बंद!
Ranveer Singh and Deepika PadukoneImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 08, 2026 | 1:43 PM
Share

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र याच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. फक्त प्रेक्षकच नाही तर इंडस्ट्रीतल्या मोठ्या कलाकारांनीही रणवीरच्या दमदार अभिनयाचं आणि चित्रपटाचं तोंड भरून कौतुक केलं. मात्र रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण अद्याप याबाबत मौन बाळगून होती. दीपिकाने ‘धुरंधर’ या चित्रपटाविषयी किंवा रणवीरविषयी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. रणवीरच्या इतक्या यशस्वी चित्रपटावर दीपिकाने साधलेलं मौन प्रेक्षकांना खटकू लागलं आहे. यावरून सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अखेर दीपिकाने यावर मौन सोडत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये ‘धुरंधर 2’च्या ब्लॉकबस्टर परफॉर्मन्सवर दीपिकाने साधलेल्या मौनावरून निशाणा साधण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘दीपिका पादुकोणने 500 कोटी रुपये बजेटच्या चित्रपटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. जिथे ‘धुरंधर 2’ने जगभरात रेकॉर्ड मोडले आहेत, तिथे दीपिका चित्रपटाच्या प्रीमियरला सुद्धा पोहोचली नव्हती. याउलट ती सासरच्या मंडळींसोबत सितारच्या कॉन्सर्टला गेली होती. तिने कोणतीच पोस्ट लिहिली नाही, कसलंही कौतुक केलं नाही. फक्त मौन बाळगलं आहे. इंटरनेटवर सुरू असलेल्या ड्रामापासून ती वाचण्याचा प्रयत्न करतेय का?

दीपिका पादुकोणचं उत्तर-

या पोस्टवर दीपिकाने अखेर मौन सोडलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये तिने लिहिलं, ‘जे शेवटी म्हटलंस तेच मित्रा.. ता. क.- मी हा चित्रपट तुम्हा सर्वांच्या खूप आधीच पाहिला होता. आता सांगा, हा विनोद कोणावर आहे?,’ दीपिकाच्या या उत्तरानंतर अनेकजण तिला पाठिंबा देत आहेत. सेलिब्रिटींना विनाकारण लक्ष्य करणं चुकीचं आहे, असं काहींनी म्हटलंय.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. याआधी डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जबरदस्त कामगिरी केली होती. जगभरात या चित्रपटाने 1300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर आता रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर 2’ने जगभरात 1600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करतच आहेत, त्याचसोबत बॉलिवूड इंडस्ट्रीपासून टॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार या चित्रपटाची प्रशंसा करणारे पोस्ट लिहित आहेत. रजनीकांत, अल्लू अर्जुन, महेश बाबू, अनुपम खेर, कंगना राणौत, विजय देवरकोंडा, ज्युनिअर एनटीआर यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर ‘धुरंधर 2’साठी खास पोस्ट लिहित रणवीर आणि टीमची पाठ थोपटली आहे. पण या सर्वांत नेटकऱ्यांना एकच प्रश्न पडला होता की, रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण याबद्दल गप्प का आहे?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...