AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दीपिकाच्या पर्सला हात, पाहा दीपिकाने काय केलं…

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते

Video : रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दीपिकाच्या पर्सला हात, पाहा दीपिकाने काय केलं...
| Updated on: Feb 26, 2021 | 1:43 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. दीपिका चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. मात्र, सध्या सोशल मीडियावर ग्लॅमगर्ल दीपिकाचा एक व्हिडीओ खूप जास्त व्हायरल झाला आहे. गुरुवारी रात्री उशीरा एका हॉटेलबाहेर दीपिकाला स्पॉट केलं गेलं. (Deepika Padukone’s video goes viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जेवणानंतर हॉटेलमधून बाहेर पडतं असताना दीपिकाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीतून बाहेर पडणं दीपिकासाठी मोठं कठीण झाले होते. बॉडीगार्डच्या मदतीने दीपिका गर्दीतून वाट काढत होती. मात्र, यावेळी चाहत्यांसोबतच काही रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिला दीपिकासमोर आल्या. दीपिका गाडीत बसत असताना वस्तू विकणाऱ्या एका महिलेनं तिची पर्स ओढली.

यामुळे त्याठिकाणी गोंधळ झाला. मात्र, दीपिकाच्या सहकाऱ्यांनी लगेचच महिलेच्या हातून पर्स सोडवून घेत दीपिकाला ती परत केली. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर दिपीकाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. दीपिका सध्या बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम करत आहेत. ती सध्या शकुन बत्राच्या अनटाइटिल्ड चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

या चित्रपटात दीपिकासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. त्याचबरोबर दीपिका कबीर खानचा चित्रपट 83 मध्ये तिचा पती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय दीपिका लवकरच पठाण चित्रपटाच्या शूटिंगसाठी दुबईला जाणार आहे.

संबंधित बातम्या : 

Video : बाॅलिवूडचा दबंग खान राखीच्याही मदतीला गेला धावून, आईने मानले आभार!

शहनाज गिलसोबतच्या लग्नाबाबत सिद्धार्थ शुक्लाचे मोठे भाष्य, म्हणाला….

Tandav : अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक; सैफच्याही अडचणी वाढल्या

(Deepika Padukone’s video goes viral on social media)

Follow Us
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.