AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | चित्रपट बनणारच! दिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला 14 जून रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत, दिल्ली उच्च न्यायालयाने आता अभिनेत्याच्या जीवनावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’या चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे.

Sushant Singh Rajput | चित्रपट बनणारच! दिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका
सुशांत सिंह राजपूत
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 12:23 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला 14 जून रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत, दिल्ली उच्च न्यायालयाने आता अभिनेत्याच्या जीवनावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’या चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने “न्याय : द जस्टिस” या चित्रपटावर रोक लावण्यास नकार दिला आहे (Delhi high court dismiss Sushant Singh Rajput father KK Singh petition against film).

बातमीनुसार अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी एक याचिका दाखल केली होती आणि या याचिकेत त्यांनी सुशांतच्या आयुष्यावर आधारित विविध प्रस्तावित प्रकल्पांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या याचिकेत सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी आपल्या मुलाचे नाव किंवा तत्सम पात्र असणाऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

यासोबतच सुशांतच्या जीवनावर आधारित आगामी किंवा प्रस्तावित प्रकल्पांचा उल्लेख या याचिकेत करण्यात आला होता. ज्यात “सुसाईड ओर मर्डर : अ स्टार वॉज लॉस्ट”, ‘शशांक’ आणि एका निनावी चित्रपटाचा उल्लेख होता. अशा परिस्थितीत सुशांतच्या चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसू शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असेही यात म्हटले होते.

चित्रपटाची कथा आणि नाव बदलले!

यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘न्याय’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी याची कथा पूर्णपणे बदलली आहे. चित्रपटाच्या नावासह दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात या कथेतही बदल करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. आता या चित्रपटाचे नवीन शीर्षक आता ‘शशांक’ असे झाले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे वडील केके सिंह यांना वाटते की, त्यांचा मुलगा आणि कुटूंबाचे नाव बदनाम करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचा फायदा घेऊन, त्यांच्या चित्रपटाचे मार्केटिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत (Delhi high court dismiss Sushant Singh Rajput father KK Singh petition against film).

सुशांत प्रकरण अपडेट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये निधन झाले होते. अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे कळताच त्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता. अभिनेत्याच्या मृत्यूच्या 1 महिन्यानंतर, कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता आणि रिया चक्रवर्तीविरूद्ध तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर आता सीबीआय आणि एनसीबी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

एनसीबीच्या तपासणीत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तुरूंगाची हवा देखील खाल्ली आहे. यासह आणखी बरीच मोठी नावे यात समोर आली होती, आता पुन्हा एकदा एनसीबी कारवाई करत आहे आणि नुकतीच सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक देखील केली आहे. त्याच्या चौकशीच्या आधारे आता आणखी काही लोकांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

(Delhi high court dismiss Sushant Singh Rajput father KK Singh petition against film)

हेही वाचा :

Photo : मिथुनची सून मदालसा शर्माची स्पा पार्लरमध्ये धमाल, अनघा भोसलेसोबत फोटो शेअर

अभिनेते बोमन ईराणींना मातृशोक, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे देखील मागू शकली असती पण…’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.