AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेते बोमन ईराणींना मातृशोक, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे देखील मागू शकली असती पण…’

बॉलिवूड अभिनेते बोमन ईराणी (Boman Irani) यांच्या आईचे बुधवारी (9 जून) सकाळी निधन झाले. बोमन ईराणी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी आईचा फोटो शेअर केला आहे आणि पोस्ट लिहित तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेते बोमन ईराणींना मातृशोक, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे देखील मागू शकली असती पण...’
बोमन ईराणी
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 11:11 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेते बोमन ईराणी (Boman Irani) यांच्या आईचे बुधवारी (9 जून) सकाळी निधन झाले. बोमन ईराणी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी आईचा फोटो शेअर केला आहे आणि पोस्ट लिहित तिला श्रद्धांजली वाहिली आहे. बोमनच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे (Boman Irani Mother passed away last morning actor share emotional post).

बोमन ईराणी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे – ‘मदर ईराणी झोपेतच या जगाला निरोप देऊन गेली. त्यांचे वय 94 वर्षांचे होते. 32 वर्षांची असल्यापासूनच तिने माझ्यासाठी आई व वडील या दोघांचीही भूमिका पाये पाडली आहे. ती खूप चांगली होती. ती आम्हाला मजेशीर किस्से सांगायची.’

बोमन पुढे लिहितात, ‘जेव्हा ती मला चित्रपट पाहण्यासाठी पाठवायची, तेव्हा ती कंपाऊंडमधील सर्व मुले माझ्याबरोबर जातील यासाठी ती प्रयत्न करत असत. इतकंच नाही तर, म्हणायची चित्रपट पाहताना पॉपकॉर्न खायला विसरू नका. तिला खाणे आणि गाणे खूप आवडायचे. तसेच शेवटच्या क्षणापर्यंत विकिपिडिया आणि आयएमडीबीवर घडणाऱ्या घटना तपासात असायची.’

बोमन म्हणतात, ‘ती नेहमी म्हणायची, लोक कौतुक करतात म्हणून तू अभिनेता नाहीस. तू अभिनेता आहेस म्हणून तू लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले पाहिजे. लोकांना नेहमी आनंदी ठेव. काल रात्री तिने मलाई कुल्फी आणि आंबा मागितला होता. जर तिला हवे असते तर, ती चंद्र आणि तारे देखील मागू शकली असती. ती नेहमीच एक स्टार होती आणि असेल.’(Boman Irani Mother passed away last morning actor share emotional post)

पाहा पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Boman Irani (@boman_irani)

सेलिब्रेटींनी श्रद्धांजली वाहिली

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी बोमन ईराणी यांच्या पोस्टवर कमेंट करून शोक व्यक्त केला आहे. दीया मिर्झाने हार्ट आणि हात जोडलेले इमोजी पोस्ट केले. ‘देव त्यांच्या आत्म्याला शांती देतील’, अशी प्रतिक्रिया बोमनचे चाहतेही व्यक्त करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, बोमन ईराणी अखेर ‘मस्का’ चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. लवकरच ते अमिताभ बच्चन आणि अजय देवगनसमवेत ‘मे डे’ या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय ते कबीर खानच्या ‘83’ या चित्रपटातही दिसणार आहेत. जा चित्रपट कपिल देव यांचा बायोपिक आहे.

(Boman Irani Mother passed away last morning actor share emotional post)

हेही वाचा :

‘आईने झूठें हैं, सच्ची तस्वीरे हैं!’, घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीला ओळखणंही मुश्किल!

Video | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने सोशल मीडियावर शेअर केला योगा व्हिडीओ, पाहून चाहते म्हणतायत…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.