AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने सोशल मीडियावर शेअर केला योगा व्हिडीओ, पाहून चाहते म्हणतायत…

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. बर्‍याचदा ती आपल्या वक्तव्यांमुळे किंवा व्हिडीओंमुळे चर्चेत राहत असते. नुकताच राखी सावंतचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखी सावंत चक्क योगा करताना दिसत आहे.

Video | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने सोशल मीडियावर शेअर केला योगा व्हिडीओ, पाहून चाहते म्हणतायत...
राखी सावंत
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 6:20 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. बर्‍याचदा ती आपल्या वक्तव्यांमुळे किंवा व्हिडीओंमुळे चर्चेत राहत असते. नुकताच राखी सावंतचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखी सावंत चक्क योगा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ राखी सावंतने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे (Actress Rakhi Sawant Share yoga video on social media fans troll her over cloths).

राखी सावंतने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, राखी अतिशय कठीण योगा प्रकार करत आहे आणि यादरम्यान तिने केवळ आंतरवस्त्र परिधान केले आहे. या दरम्यान दोन लोक (एक स्त्री आणि एक पुरुष) राखीला योगा शिकवत आहेत. यंदाच्या वर्षी अभिनेत्री राखी सावंत 42 वर्षांची झाली आहे आणि तिला नेहमी तंदुरुस्त राहण्याची सवय आहे. म्हणूनच ती नेहमी अ‍ॅक्टिव दिसत आहे.

पाहा राखीचा व्हिडीओ :

अवघ्या एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 489 हजाराहून अधिक व्हुव्ज मिळाले आहेत. याशिवाय 1 हजारांहून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. राखीच्या या व्हिडीओवर जास्तीत जास्त लोकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत (Actress Rakhi Sawant Share yoga video on social media fans troll her over cloths).

एका वापरकर्त्याने यावर कमेंट करत लिहिले की, ‘काही कपडे तर घातले असते.’ त्याच वेळी, दुसर्‍या वापरकर्त्याने कमेंट लिहिली की, ‘कसरतसाठी कपडे का उतरवावे लागतात? हा ट्रेंड काय आहे हेच माहित नाही.’ इतकेच नाही तर, राखी सावंतने नुकताच आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्येही ती योगा करत आहे. व्हिडीओ सामायिक करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “योगा से ही होगा”!

पाहा व्हिडीओ :

‘बिग बॉस 14’मधून केले चाहत्यांचे मनोरंजन

सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता. या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केले होते. त्याचबरोबर शोच्या फिनालेमध्ये राखी सावंतने 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडत सर्वांनाच चकित केले होते. ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या घरात तिने पती रितेश याच्याबद्दलही अनेक मोठे खुलासे केले होते.

आता ती पुन्हा रितेशशीच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. ती सध्या रितेशच्या संपर्कात असल्याचे तिचे म्हणणे आहे. आता राखी अभिनवला विसरली असल्याचे दिसते आहे. ‘बिग बॉस 14’च्या घरात राखी अभिनव शुक्लासोबत (Abhinav Shukla) लग्न करण्याबद्दलही बोलली होती. इतकेच नाही तर, या घरात रुबिना अर्थात अभिनवची पत्नी असतानाही राखीने अभिनवसमोर अनेक वेळा आपले प्रेम व्यक्त केले होते.

(Actress Rakhi Sawant Share yoga video on social media fans troll her over cloths).

हेही वाचा :

Photo : अजब कपड्यांमध्ये दिसली सोनम कपूर, सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल

Nusrat Jahan controversy: नुसरत जहांचं लग्न मोडलं, पतीवर गंभीर आरोप, 7 मोठ मोठे दावे, वाचा सविस्तर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.