Photo : मिथुनची सून मदालसा शर्माची स्पा पार्लरमध्ये धमाल, अनघा भोसलेसोबत फोटो शेअर

कमी वेळात मदालसानं स्वत:ची एक चांगली ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिनं स्पा पार्लरमधून काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.(Mithun's daughter-in-law Madalasa Sharma shared photos from the spa parlor)

1/6
Madalsa M Chakraborty
मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सध्या अनुपमा या मालिकेत आपल्या धमाकेदार अभिनयानं चाहत्यांचं मन जिंकतेय. ही तिची पहिलीच मालिका आहे आणि पहिल्याच मालिकेतून तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. मदालसा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होते.
2/6
Madalsa M Chakraborty
कमी वेळात तिनं स्वत:ची एक चांगली ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिनं स्पा पार्लरमधून काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3/6
Madalsa M Chakraborty
तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये नंदू म्हणजेच अनघा भोसले मदालसाबरोबर आहे. दोघी बाथरोबमध्ये दिसल्या आहेत. दोघांच्याही डोक्यावर गुलाबाचे फूल आहे.
4/6
Madalsa M Chakraborty
याआधीही या दोघींचा डान्स व्हिडीओ चर्चेत होता, यात दोघीही 'पिया पिया' या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत होते. या व्हिडीओला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
5/6
Madalsa M Chakraborty
मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये ती काव्याची भूमिका साकारत आहे. काव्या ही सुशिक्षित, स्वतंत्र आणि आधुनिक मुलगी आहे. शोमधील काव्याची व्यक्तिरेखा आत्मविश्वासपूर्ण आहे.
6/6
Madalsa M Chakraborty
मदालसा ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शीला शर्मा आणि दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. गणेश आचार्य निर्मित 'एंजेल' चित्रपटात मादासानं बॉलिवूडमध्ये काम केले आहे.