खान्देशी गाण्याने धनश्री-अमृताला लावलं वेड, केला असा भन्नाट डान्स की, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
फिरी फिरी नाच पोरा या खान्देशी गाण्यावर अभिनेत्री अमृता धोंगडे आणि धनश्री काडगावकरचा भन्नाट डान्स. सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल.

सोशल मीडियावर दररोज नवनवीन गाणी आणि ट्रेंड पाहायला मिळतात. एखादं गाणं ट्रेंडिंग झालं की कलाकारांपासून ते सोशल मीडिया यूजर्सपर्यंत अनेकजण त्या गाण्यावर रील्स बनवताना दिसतात. सध्या असंच एक खान्देशी गाणं इन्स्टाग्रामवर चांगलंच गाजत आहे. ‘फिरी फिरी नाच पोरा…’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून या गाण्याच्या हुक स्टेप्सवर अनेक जण रील्स बनवत आहेत.
या ट्रेंडमध्ये आता मराठी मनोरंजनसृष्टीतील दोन लोकप्रिय अभिनेत्री सहभागी झाल्या आहेत. अमृता धोंगडे आणि धनश्री काडगावकर यांनी ‘फिरी फिरी नाच पोरा…’ या गाण्यावर भन्नाट डान्स करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धनश्रीने हा खास डान्स व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
‘फिरी फिरी नाच पोरा…’ मराठी अभिनेत्रींचा डान्स
या व्हिडीओमध्ये अमृता आणि धनश्री दोघीही ‘फिरी फिरी नाच पोरा…’ या गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. दोघींनीही गाण्याची हुक स्टेप अगदी उत्साहात केली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि डान्समधील एनर्जी पाहून चाहत्यांनाही हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र अशा अंदाजात पाहायला मिळाल्याने चाहत्यांनी त्यांच्या रीलवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
धनश्रीने हा व्हिडीओ शेअर करताच तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. चाहत्यांसोबतच मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही या रीलवर कमेंट्स करत दोघींचं कौतुक केलं आहे. अमृता आणि धनश्री यांची जुगलबंदी पाहून अनेक चाहत्यांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ‘फिरी फिरी नाच पोरा’सोबत अमृता आणि धनश्रीचा डान्स चर्चेत आहे.
अमृता-धनश्री सध्या काय करतात?
दरम्यान, अभिनेत्री अमृता धोंगडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून अमृताला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. त्यानंतर अमृता विविध प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.
View this post on Instagram
तर दुसरीकडे धनश्री काडगावकर हिने ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात आपली ओळख निर्माण केली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या अभिनयासोबतच धनश्री सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या धनश्री ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
