AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’ने आमिर खानला केलं चितपट; मोडला ‘दंगल’चा हा मोठा रेकॉर्ड, ऐतिहासिक कामगिरी!

रणवीर सिंहचा 'धुरंधर : द रिव्हेंज' हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. आता रणवीरच्या या चित्रपटाने आमिर खानच्या 'दंगल'चाही मोठा रेकॉर्ड मोडला आहे.

'धुरंधर 2'ने आमिर खानला केलं चितपट; मोडला 'दंगल'चा हा मोठा रेकॉर्ड, ऐतिहासिक कामगिरी!
Dhurandhar 2 and DangalImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 08, 2026 | 7:16 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ऑफिसवर तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. अवघ्या तीन आठवड्यात रणवीरच्या या चित्रपटाने जगभरात 1600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर मोठमोठ्या चित्रपटांच्या विक्रमाला धूळ चालणाऱ्या या चित्रपटाने आता आमिर खानच्या ‘दंगल’लाही चितपट केलं आहे. ‘दंगल’चा मोठा रेकॉर्ड ‘धुरंधर 2’ने मोडला आहे.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटाने जगभरात सर्वाधिक कमाई केली होती. वर्ल्डवाइड 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणारा हा चित्रपट तेव्हापासून पहिल्या क्रमांकावर आहे. यादरम्यान ‘धुरंधर 2’ने ‘दंगल’चा एक विक्रम मोडला आहे. सर्वात जलद गतीने 1600 कोटी रुपये कमाई करण्याचा विक्रम ‘धुरंधर 2’ने आपल्या नावावर केला आहे. ‘दंगल’ या चित्रपटाला हा आकडा गाठण्यासाठी 25 दिवस लागले होते. तर प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या ‘बाहुबली 2’ या चित्रपटाने 28 दिवसात 1600 कोटी रुपये कमावले होते. ‘धुरंधर 2’ने अवघ्या 18 दिवसांत हा इतिहास रचला आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर 102 कोटी रुपये कमावत ओपनिंग केली होती. त्यानंतर या चित्रपटाची दमदार कमाई सुरूच आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 1013.77 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा एक स्पाय थ्रिलर असून यामध्ये रणवीर सिंहने हमजा अली मजारी या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. जसकीरत सिंह रंगी हा हमजा बनून पाकिस्तानात जातो आणि तिथल्या गँगस्टर विश्वाला संपवतो. यामध्ये रणवीरसोबतच आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तर येत्या 17 एप्रिल रोजी अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत रणवीरच्या चित्रपटासाठी मैदान मोकळंच आहे. हा चित्रपट आमिर खानच्या ‘दंगल’चा रेकॉर्ड मोडू शकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...