AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 Certificate: रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ सेन्सॉरच्या कचाट्यात? व्हायरल सर्टिफिकेटचे सत्य काय?

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या सेन्सॉर सर्टिफिकेटबाबतच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. व्हायरल होत असलेले सर्टिफिकेट ‘धुरंधर: द रिवेंज’ या सिक्वेलचे नसून, पहिल्या चित्रपटाच्या टीव्ही प्रदर्शनासाठी बदललेल्या व्हर्जनचे आहे. ‘धुरंधर 2’ चे काम अजून पूर्ण झालेले नसल्याने ते सेन्सॉर बोर्डाकडे पाठवलेच गेलेले नाही.

Dhurandhar 2 Certificate: रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सेन्सॉरच्या कचाट्यात? व्हायरल सर्टिफिकेटचे सत्य काय?
DhurandharImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 24, 2026 | 6:02 PM
Share

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्याच्या चित्रपटाचा पुढच्या भागाची चर्चा जोरात सुरू आहे. डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींची कमाई करत विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे आता ‘धुरंधर 2’ बाबत चाहत्यांची उत्सुकता आकाशाला पोहोचली आहे. या दरम्यान, या सिनेमाच्या पार्ट टूच्या काही भागाला सेसॉर बोर्डाची कात्री लागली आणि काही दृश्यांवर कात्री चालवण्यात आली, अशी बातमी सोशल मीडियावर सुरू होती. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार या व्हायरल दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सेन्सॉर प्रक्रियेबाबत पसरवण्यात आलेल्या अफवा दिशाभूल करणाऱ्या ठरत असून चित्रपटाबाबतची खरी परिस्थिती आता उघड झाली आहे.

‘धुरंधर 2’ अद्याप तयार नाही

दिग्दर्शक आदित्य धरच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे विविध अफवा आणि दावे सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. अशातच चित्रपटाचे कथित सेन्सॉर सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेकांनी त्यावर विश्वासही ठेवला. मात्र, या सर्टिफिकेटमागील सत्य वेगळेच आहे. प्रत्यक्षात ‘धुरंधर 2’ अद्याप सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आलेलाच नाही.

कारण चित्रपटाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सेन्सॉर प्रक्रियेचा प्रश्नच उद्भवत नाही. व्हायरल होत असलेले सर्टिफिकेट बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून चाहत्यांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

व्हायरल सर्टिफिकेटबद्दल सत्य काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले सर्टिफिकेट चुकीचे आहे. लोक म्हणत होते की, ‘धुरंधर 2’ ला A ऐवजी UA 16+ दिला गेला, पण हा दावा पूर्णपणे खोटा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जे ऑनलाइन सर्टिफिकेट व्हायरल होत आहे, ते चित्रपटाच्या सिक्वेलचे नाही. खरं तर सिक्वेलचे अधिकृत नाव ‘धुरंधर: द रिवेंज’ आहे, पण व्हायरल सर्टिफिकेट मूळ फ्रँचायझीच्या पहिल्या चित्रपटाचे आहे. त्यावर ‘धुंरधर’ असे लिहिलेले आहे. CBFC च्या वेबसाइटवर दिसणारे सर्टिफिकेट डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या चित्रपटाच्या टेलिव्हिजन प्रीमियरशी संबंधित आहे.

नेमका बदल काय?

चित्रपटाचे शूटिंग मागील आठवड्यापर्यंत सुरू होते. सूत्रांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले सर्टिफिकेट पहिल्या चित्रपटाशी संबंधित आहे, सिक्वेलशी नाही. पहिला भागाला जेव्हा रिलीज झाले तेव्हा A सर्टिफिकेट मिळाले होते, पण आता टीव्हीवर दाखवण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत.

नियमांनुसार टीव्हीवर चित्रपट दाखवताना काही सीन कापावे लागतात आणि शिव्या म्युट कराव्या लागतात. यामुळे टीव्ही व्हर्जन तयार करताना चित्रपटाचा रन-टाइम 208 मिनिटांवर कमी झाला आणि त्याला UA 16+ सर्टिफिकेट मिळाले आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक