AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाऊद इब्राहिमच्या घराचा पत्ता अखेर सापडला, ‘धुरंधर 2’ मधील ‘व्हाइट हाउस 13, क्लिफ्टन’चं मोठं रहस्य

'धुरंधर 2' सिनेमात दाऊद इब्राहिम याचं कराची येथील ठिकाण खास पद्धतीत दाखवण्यात आलं आहे. दिग्दर्शक आदित्य धर याने सिनेमात दाऊद याचं प्रचंड भव्य आणि आलिशानल दाखवलं आहे.. ज्याला 'व्हाइट हाउस 13, क्लिफ्टन' असं नाव दिलं आहे.

दाऊद इब्राहिमच्या घराचा पत्ता अखेर सापडला, 'धुरंधर 2' मधील 'व्हाइट हाउस 13, क्लिफ्टन'चं मोठं रहस्य
White House 13 Clifton
| Updated on: Apr 01, 2026 | 11:49 AM
Share

अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सिनेमात आदित्य याने दाऊद इब्राहिम याचं कराची येथील स्थान एका वेगळ्या रुपात दाखवलं आहे, ज्याला ‘व्हाइट हाउस 13, क्लिफ्टन‘ असं नाव देण्यात आलं आहे… क्लिफ्टनबद्दल सांगायचं झालं तर, क्लिफ्टन पाकिस्तानातील एक श्रीमंत भाग आहे. जेथे महागडी घरं, परदेशी दूतावास आणि आलिशान ब्रँडची दुकाने आहेत. हे ठिकाण एका सौदी मशिदीजवळ आणि क्लिफ्टन बीचपासून थोड्याच अंतरावर आहे. ‘धुरंधर 2’ सिनेमात या मोठ्या पांढऱ्या महालाला ‘व्हाइट हाऊस’ म्हटलं आहे.

दाऊद इब्राहिम याच्या घरात काय दाखवण्यात आलं आहे?

सिनेमात महालाच्या आतील आणि बाहेरील अनेक उल्लेखनीय वैशिष्ट्ये दाखवण्यात आली आहेत:

– महालाच्या मोठ्या गेटवर मोठ – मोठ्या डॉलरचे निशाण दाखवण्यात आली आहेत.

– स्तंभांजवळ सोन्याच्या घारीच्या मूर्ती ठेवल्या आहेत.

– महालाच्या आतमध्ये, झगमगते झुंबर, रुंद जिने आणि मोठे जेवणाचे टेबल आहेत, जिथे पार्ट्यांचं चित्रण केलेलं आहे.

– भिंतींवर सिंहांची चित्रं आहेत, ज्यांना सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं.

– मास्टर बेडरूममध्ये एक मोठा पलंग, सुंदर पडदे आणि दाऊदचा एक जुना फोटो आहे.

– दाऊदचं वय आणि त्याची प्रकृती लक्षात घेत सिनेमात एक अधुनिक ICU देखील दाखवण्यात आला आहे.

सिनेमात दाखल आलेल्या या महालासारख्या घराला दाऊद याचं गुप्त पण आलिशान ठिकाण सांगण्यात आलं आहे. ‘धुरंधर 2’ सिनेमात दाऊद याला बडे साबह म्हणून दाखवण्यात आलं आहे. येथे सुरक्षा व्यवस्था खूप कडक दाखवण्यात आली असून मेटल डिटेक्टरने तपासणी केली जाते, शस्त्रे जमा केली जातात आणि परदेशी कर्मचारी काम करतात.

दाऊद इब्राहिम याचा खरा पत्ता

रिपोर्टनुसार, दाऊद इब्राहिम याला पत्ता वेगळा सांगितला जातो. जानेवारी 2024 मध्ये ‘संडे गार्जियन’च्या रिपोर्टनुसार, दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनीस कराची येथील कय्यूमाबाद मधील दोन व्हिलामध्ये राहतात. हाउस नंबर 20 आणि 21, स्ट्रीट नंबर 30, फेज V, सेक्टर B… असं दाऊद याचा पत्ता सांगण्यात येत आहे.

हे ठिकाण चिनी वाणिज्य दूतावासापासून अंदाजे 700 मीटर अंतरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद क्वचितच बाहेर पडतो, विश्वासू व्यक्तींच्या संरक्षणाखाली राहतो आणि कुटुंबातील सदस्यांनाही केवळ बोलावून भेटतो. त्याची प्रकृती खालावलेली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. असेही म्हटलं जातं की, डीएचए फेज 5 मध्ये देखील त्याची एक मालमत्ता आहे.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिम भारतातून पाकिस्तानात पळून गेला. पण, क्लिफ्टनमधील या ठिकाणाची निवड करून, दिग्दर्शकाने दाऊदची आलिशान जीवनशैली सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. सिनेमात त्याला एक 70 वर्षीय दहशतवादी म्हणून दाखवले आहे, जो आजारी असूनही भारताच्या विरोधात कट रचत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...