Dhurandhar 2: महावीर जयंतीला ‘धुरंधर 2’ची धुआंधार कमाई; हिंदीत सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम

Dhurandhar 2: रणवीर सिंहच्या 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तेराव्या दिवशी दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.

Dhurandhar 2: महावीर जयंतीला धुरंधर 2ची धुआंधार कमाई; हिंदीत सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम
रणवीर सिंह
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2026 | 8:58 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. मंगळवारी महावीर जयंतीच्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाला पुरेपूर मिळाला आहे. मंगळवारी या चित्रपटाने केवळ बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रमच मोडला नाही, तर तो भारतीय बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे. बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’ला दोन आठवडे पूर्ण होत आले आहेत. तरी अद्याप त्याच्या कमाईला कोणताच ब्रेक लागलेला नाही. रणवीर सिंहच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपलं मजबूत स्थान कायम ठेवलं आहे. ‘धुरंधर 2’ने आतापर्यंत 899.92 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासह हा चित्रपट तेराव्या दिवशी भारतात 900 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या जवळ पोहोचला आहे. ‘धुरंधर 2’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या मंगळवारी (तेराव्या दिवशी) अंदाजे 27.75 कोटी रुपये कमावले आहेत. हा आकडा सोमवारच्या 25.30 कोटी रुपयांपेक्षा किंचित जास्त आहे.

‘धुरंधर 2’ची आतापर्यंतची कमाई

दिवस कमाई
पेड प्रीव्ह्यू 43 कोटी रुपये
पहिला दिवस (गुरुवार) 102.55 कोटी रुपये
दुसरा दिवस (शुक्रवार) 80.72 कोटी रुपये
तिसरा दिवस (शनिवार) 113.00 कोटी रुपये
चौथा दिवस (रविवार) 114.85 कोटी रुपये
पाचवा दिवस (सोमवार) 65 कोटी रुपये
सहावा दिवस (मंगळवार) 56 कोटी रुपये
सातवा दिवस (बुधवार) 48.75 कोटी रुपये
आठवा दिवस (गुरुवार) 49.70 कोटी रुपये
नववा दिवस (शुक्रवार) 41.75 कोटी रुपये
दहावा दिवस (शनिवार) 62.85 कोटी रुपये
अकरावा दिवस (रविवार) 68.10 कोटी रुपये
बारावा दिवस (सोमवार) 25.30 कोटी रुपये
तेरावा दिवस (मंगळवार) 27.75 कोटी रुपये

‘धुरंधर 2’ची जगभरातील कमाई

बॉक्स ऑफिस ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची एकूण कमाई 1077.41 कोटी रुपये झाली आहे. परदेशात रणवीरच्या या चित्रपटाने 358 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे ‘धुरंधर 2’चा जगभरातील एकूण कमाईचा आकडा 1435.41 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता हा चित्रपट 1500 कोटींच्या विक्रमाकडे वळतोय.

जवळपास तीन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा 812 कोटी रुपयांचा विक्रम मोडून 840 कोटी रुपये कमावले होते. आता ‘धुरंधर 2’ने आपल्याच पहिल्या भागाचा विक्रम मोडला आहे. अवघ्या 13 दिवसांत हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

सर्वाधिक कमाई करणारे हिंदी चित्रपट

  • धुरंधर 2- 843 कोटी रुपये
  • धुरंधर- 840.20 कोटी रुपये
  • पुष्पा 2- 812.10 कोटी रुपये
  • स्त्री 2- 598 कोटी रुपये
  • छावा- 585.70 कोटी रुपये
Follow Us