AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 Teaser : ये नया हिंदुस्तान है..; ‘धुरंधर 2’चा टीझर सर्व रेकॉर्ड मोडणार, रणवीर सिंहचा कडक अंदाज

Dhurandhar 2 The Revenge: आदित्य धर दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'धुरंधर 2'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये हमजाच्या भूमिकेतील रणवीर सिंहचा नवीन अंदाज पहायला मिळतोय.

Dhurandhar 2 Teaser : ये नया हिंदुस्तान है..; 'धुरंधर 2'चा टीझर सर्व रेकॉर्ड मोडणार, रणवीर सिंहचा कडक अंदाज
Dhurandhar 2 TeaserImage Credit source: Youtube
| Updated on: Feb 03, 2026 | 12:41 PM
Share

Dhurandhar 2 Teaser : ‘धुरंधर 2 : द रेव्हेंज’चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये रणवीर सिंहचा 2.0 अंदाज पहायला मिळतोय. या टीझरची सुरुवातच हिंसक दृश्याने होते आणि पुढेही अशी बरीच दृश्ये पहायला मिळतात, ज्यामुळे अंगावर अक्षरश: काटा येतो. रणवीर सिंह हा हमजा कसा बनला, या प्रवासाची झलक या टीझरमध्ये दिसतेय. त्याचसोबत रेहमान डकैतच्या मृत्यूनंतर संपूर्ण कराचीवर त्याचं राज्य कसं निर्माण होतं आणि त्यासाठी तो काय-काय करतो, हे सर्व यात दाखवण्यात आलं आहे. यामध्ये अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्या भूमिकांचीही झलक पहायला मिळतेय. रणवीर सिंहच्या चित्रपटाचा हा टीझर सर्व रेकॉर्ड मोडणार, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल 1300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या भागाच्या शेवटीच सीक्वेलची घोषणा करण्यात आली होती. त्याचसोबत प्रदर्शनाची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासूनच ‘धुरंधर 2’च्या टीझरविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर हा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या टीझरमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे रणवीर सिंहचा लूक. हमजा बनण्याच्या तयारीत असलेला एक आणि ल्यारीवर ताबा मिळवल्यानंतर त्याचा दुसरा लूक.. असे दोन्ही लूक जबरदस्त दाखवण्यात आले आहेत. ‘धुरंधर 2’मध्ये पहिल्या भागाच्या तुलनेत अधिक हिंसा दाखवण्यात येणार, असा अंदाज आधीच होता. टीझर पाहून त्यावरही शिक्कामोर्तब झाला आहे. हिंसक दृश्यांमुळे अनेकांनी आदित्य धरवर टीकासुद्धा केली होत. येत्या 19 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या टीझरच्या शेवटी रणवीर सिंहचा एक डायलॉगसुद्धा चर्चेत आला आहे. ‘ये नया हिंदुस्तान है.. ये घर में घुसेगा भी और मारेगा भी’ असा हा डायलॉग आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

‘धुरंधर’ची कथा

‘धुरंधर’मध्ये गुप्तहेर हमजा अली मजारी या नावाने पाकिस्तानात जातो. ल्यारीमधील बलुच टोळीचा गुंड रेहमान डकैत याचा विश्वास जिंकून तो त्याच्या टोळीत सामील होतो. नंतर एसपी अस्लम चौधरीच्या मदतीने तो रेहमानच्या हत्येचा कट रचतो. तर दुसरीकडे संपूर्ण कराचीवर मला राज्य करायचं आहे, असं तो प्रेयसी यलिनासमोर म्हणतो. चित्रपटाच्या शेवटी हमजा एक गुप्त डायरी उघडतो, ज्यामध्ये ISI अधिकारी मेजर इक्बालसह अनेक हाय-प्रोफाइल नावं असतात. हे मिशन म्हणजे फक्त सुरुवात आहे, असं अजय सन्याल स्पष्ट करतात.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?