AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयेशा खान हिच्यावर बलात्काराचा प्रयत्न… स्पॉटबॉयचे नको ते मेसेज आणि… अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा

आयेशा खान हिच्यासोबत नक्की काय झालं होतं? बलात्काराचा प्रयत्न... स्पॉटबॉयकडून नको ते मेसेज आणि... अभिनेत्रीकडून इंडस्ट्रीची काळी बाजू समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयेशा खान हिच्या वक्तव्याची चर्चा...

आयेशा खान हिच्यावर बलात्काराचा प्रयत्न... स्पॉटबॉयचे नको ते मेसेज आणि... अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा
Ayesha Khan
| Updated on: Mar 05, 2026 | 10:05 AM
Share

अभिनेत्री आयेश खान हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल थक्क करणारा खुलासा केला आहे. सेलिब्रिटी असल्यामुळे कशा प्रकारे रोजच्या अव्हानांचा सामना करावा लागतो याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं आहे. अभिनेत्रींना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या तर येतातच पण लैंगिक अत्याचारासारख्या घटना देखील त्यांच्यासोबत घडत असतात. आयेशा हिने सांगितल्यानुसार, तिच्यावर एकदा बलात्कार करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला. शिवाय स्पॉटबॉयने देखील अभिनेत्रीला नको ते मेसेज पाठवले होतं…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ‘इन्स्टाग्रामवर मला कायम सेक्शुएलाइज केलं जातं.. मी एक साधा टॉप घातला तरी, लोकांना त्रास होतो… मी स्कर्ट घातला तरी लोकांना अडचण असते… मी कोणतीही पोस्ट करण्याआधी विचार करते… फक्त यात भीतीने का मला कोणी सेक्शुएलाइज करणार नाही… परिस्थिती इतकी वाईट आहे…’

पुढे आयेशा खान हिला विचारण्यात आलं, कधी ऑनलाईन बलात्काराची धमकी मिळाली आहे का? यावर अभिनेत्री होकार देत म्हणाली, रोज मला बलात्काराच्या धमक्या येत असतात… मी आता देखील तुम्हाला माझ्या फोनमध्ये दाखवू शकते… याबद्दल फक्त प्रश्न विचारले जातात, पण कोणताच मार्ग यावर काढला जात नाही… ही आजची गोष्ट नाही, गेल्या अनेक वर्षांपासून हे चालत आलेलं आहे.’

बलात्काराबद्दल आयेशा म्हणाली, ‘माझ्यावर रेपचा देखील प्रयत्न झाला. मला त्या परिस्थितीला पुन्हा पुन्हा तोंड द्यायचं नाही. असे काही दिवस, क्षण येतात जेव्हा ते मला हादरवून टाकतात. त्या जखमा मी आठवू इच्छित नाही. जर मी आता इतकी प्रसिद्ध किंवा सुरक्षित नसती तर अशी घटना पुन्हा घडू शकली असती.’

एवढंच नाही तर, अभिनेत्रीने शुटिंग दरम्यान घडलेली देखील एक घटना सांगितली. ‘मी एका सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हा माझे वडील देखील माझ्यासोबत होते. मी असंच इन्स्टाग्राम ओपन केलं आणि मला एक मेसेज दिसला… त्यामध्ये व्हाईस नोट्स होते. त्यामुळे मला असं वाटलं की स्पॉट बॉयचे मेसेज असेल…’ घाबरलेल्या अवस्थेत आयेशा हिने वडिलांना सर्वकाही सांगितलं, तेव्हा त्या स्पॉटबॉयच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमातील ‘शरारत’ गाण्यात दमदार डान्स केल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियत मोठी वाढ झाली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...