AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya Marriage : हार्दिक पांड्याने गुपचपू केलं लग्न? गर्लफ्रेंड माहिकासोबत…फोटो पाहून चर्चेला उधाण!

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. दोघांनीही गुपचूप लग्न केल्याचा दावा केला जातोय. तसा एक व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे माहिकाच्या हातात एक हिऱ्याची अंगठीही दिसत आहे.

Hardik Pandya Marriage : हार्दिक पांड्याने गुपचपू केलं लग्न? गर्लफ्रेंड माहिकासोबत...फोटो पाहून चर्चेला उधाण!
hardik pandya and mahieka sharma marriageImage Credit source: instagram
| Updated on: Nov 20, 2025 | 10:38 AM
Share

Hardik Pandya And Mahieka Sharma Marriage : भारतीय क्रिकेटर संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अॅक्ट्रेस-मॉडेल माहिका शर्मा या दोघांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर माहिकासोबत काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. याच फोटोंसोबत त्याने बिक-3 असं कॅप्शन दिलंय. अगस्त्य, पेट डॉग आणि माहिका अशा तीन गोष्टी मला आयुष्यात खूप महत्त्वाच्या आणि आवडत्या आहेत, असं हार्दिकनं या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे. दरम्यान, हार्दिकनेच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओची एका वेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. हा व्हिडीओ पाहून हार्दिक आणि माहिका यांनी गुपचूप लग्न तर केलं नाही ना? असे विचेरला जात आहे. व्हिडीओत दोघेही प्रार्थना करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. हाच व्हिडीओ पाहून या दोघांनीही लग्न तर केलं नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण या व्हिडीओत हार्दिक आणि माहिका प्रार्थना करत आहेत. विशेष म्हणजे माहिकाच्या बोटामध्ये हिऱ्याची एक अंगठी दिसत आहे. हीच आंगठी पाहून हार्दिकने माहिकाला पत्नी म्हणून स्वीकारलेलं आहे का? असा प्रश्न त्यांचे फॅन्स विचारत आहेत. या व्हिडीओत दोघेही पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत आहेत. दोघेही एकत्र प्रार्थना म्हणत आहेत. त्यामुळेदेखील अनेक चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेवर मात्र हार्दिक किंवा माहिका या दोघांनीही अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

दोघेही प्रेमात आकंठ बुडाले

हार्दिकने या व्हिडीओसोबतच काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये तो माहिकासोबत जीममध्ये दिसतोय. एका फोटोमध्ये तर हार्दिकने माहिकाला थेट उचलून घेतलं आहे. हे फोटो पाहून ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सध्यातरी हार्दिक-माहिका एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांच्या लग्नाची चर्चा होत असली तरी अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...