AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझे तसे शॉट्स नकोत, ‘पेद्दी’मधील कॅमेरा अँगलवरून जान्हवी कपूरचे चॅट्स लीक; रामचरणनेही सुनावलं

'पेद्दी' या चित्रपटातील अभिनेत्री जान्हवी कपूरच्या सीन्सवरून मोठा वाद सुरू आहे. या वादादरम्यान आता जान्हवीचे काही खासगी चॅट्स लीक झाले आहेत. या चॅट्समध्ये काय आहे, दिग्दर्शकांवर का इतकी टीका होत आहे, ते जाणून घ्या..

माझे तसे शॉट्स नकोत, 'पेद्दी'मधील कॅमेरा अँगलवरून जान्हवी कपूरचे चॅट्स लीक; रामचरणनेही सुनावलं
जान्हवी कपूरImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 07, 2026 | 10:20 AM
Share

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि साऊथ सुपरस्टार रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पेद्दी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय. मात्र या कमाईपेक्षा चित्रपटातील जान्हवी कपूरच्या सीन्सवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. या चित्रपटाला जान्हवीला फक्त अंगप्रदर्शनापुरतं वापरल्याची टीका प्रेक्षकांनी आणि काही सेलिब्रिटींनीही केली आहे. या वादादरम्यान आता जान्हवीचे काही खासगी चॅट्स लीक झाले आहेत. त्यावरून तिनेही चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना विरोध केल्याचा खुलासा झाला आहे. इतकंच नव्हे तर चुकीच्या कॅमेरा अँगलवरून रामचरणनेही दिग्दर्शकांना फटकारलं होतं. दिग्दर्शक बुची बाबू सनावर बरेच आरोप होत असताना त्यांनी जाहीर माफीनामा सादर केला. त्यानंतर लगेचच हे कथित चॅट्स सोशल मीडियावर समोर आले आहेत.

‘पेद्दी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी जान्हवी कपूरच्या भूमिकेवरून तीव्र आक्षेप नोंदवला. जान्हवीला या चित्रपटात फक्त अंगप्रदर्शन करण्यापुरतं आणि गाण्यांपुरतं वापरलं गेल्याची टीका प्रेक्षकांनी केली आहे. या चित्रपटात जान्हवीने अचियम्मा नावाची भूमिका साकारली आहे. आता व्हायरल झालेल्या चॅट्सनुसार, तिने पोस्ट प्रॉडक्शनदरम्यान तिच्या काही दृश्यांवरून आणि चुकीच्या कॅमेरा अँगलवरून आक्षेप नोंदवल्याचं स्पष्ट होत आहे. या चॅट्समध्ये ती रामचरणचीही बाजू घेताना दिसत आहे.

30 ऑक्टोबर 2025 रोजीच्या या चॅट्समध्ये जान्हवीने लिहिलंय, ‘मी त्यांना सांगितलं आहे की छाती आणि कंबरेचे शॉट्स नकोत. राम सर खूप चांगले आहेत. ते त्यांच्यावर ओरडले आणि म्हणाले, तू तिचे असे शॉट्स पुन्हा कधीही काढणार नाहीस. तेसुद्धा यावरून नाराज झाले होते.’ या लीक झालेल्या चॅट्समधून स्पष्ट होतंय की ‘पेद्दी’च्या शूटिंगदरम्यान जान्हवीच्या पात्राच्या सादरीकरणाबाबत अंतर्गत चर्चा झाली असावी आणि आक्षेप नोंदवले गेले असावेत.

जान्हवी कपूरचे चॅट्स

आणखी एका मेसेजमध्ये जान्हवीने असंही म्हटलंय की साऊथ इंडस्ट्रीमध्ये असे अनुभव खूप सामान्य आहेत. ‘दक्षिणेत हे अनेकदा घडतं’, असं तिने लिहिलं आहे. ‘गेम चेंजर्स’ या चित्रपटातील कियारा अडवाणीला तिच्या भूमिकेसाठी ज्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं, त्याच्याशी चाहत्यांनी याची तुलना केली आहे. या तुलनेला उत्तर देताना जान्हवीने पुढे म्हटलंय, ‘नाही, ते यामध्ये जो कॅमेरा अँगल घेत होते, तो त्याहूनही वाईट होता. पण राम सरांनी स्पष्टपणे नकार दिला आणि ते थांबवायला सांगितलं. मी कोणत्या त्रासातून जातेय, याची तुम्हाला कल्पना नाही. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.’

एका मेसेजमध्ये चित्रपटाच्या सेटवर पालकांच्या उपस्थितीचा उल्लेख केला. पण जान्हवीने स्पष्ट केलं की जर तिचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांनी हस्तक्षेप केला असता, तर परिस्थितीत अधिक चिघळली असती. या संपूर्ण वादानंतर आता दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित जाहीर केलं की ते ‘पेद्दी’मधील वादग्रस्त सीन्स बदलणार आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही स्त्री पात्राला वस्तू म्हणून दाखवण्याचा किंवा तिचा अपमान कऱण्याचा आमचा हेतू कधीच नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे