AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघांमध्ये नेमकं काय बिनसलंय? माधुरी दीक्षितने अनिल कपूर यांना केलं दुर्लक्ष, नेटकरीही हैराण!

सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. 'मां बहन' या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगदरम्यानचा हा व्हिडीओ आहे.

दोघांमध्ये नेमकं काय बिनसलंय? माधुरी दीक्षितने अनिल कपूर यांना केलं दुर्लक्ष, नेटकरीही हैराण!
Madhuri Dixit and Anil KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 07, 2026 | 9:18 AM
Share

अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये कमबॅक केल्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीही उत्तम प्रोजेक्ट्स करताना दिसत आहे. ‘मिसेस देशपांडे’नंतर आता माधुरी ‘मां बहन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून यामध्ये तिच्यासोबत तृप्ती डिमरीची मुख्य भूमिका आहे. मुंबईत नुकतंच या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडमधील इतरही बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र ‘मां बहन’च्या स्क्रिनिंगदरम्यान एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामागचं कारण म्हणजे यामध्ये माधुरी तिच्यासमोर असलेल्या अनिल कपूर यांच्याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या क्लिपमध्य सुरुवातीला अनिल कपूर एका जागी उभे असल्याचं दिसत आहे. त्यानंतर माधुरी त्यांच्यासमोरून फोटोशूटसाठी पुढे निघून जाते, मात्र यावेळी ती अनिल कपूर यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. तर दुसरीकडे अनिल कपूर तिच्यासमोर उभे असतात आणि तिला पुढे जाण्यासाठी हातवारेसुद्धा करतात, त्याकडेही माधुरी स्पष्टपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे. ही क्लिप पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘का, काय झालं, तिने असा लूक का दिला’, असा सवाल एकाने केला. तर ‘या दोन कलाकारांमध्ये नक्कीच काहीतरी झालं असावं. तिने त्यांच्याकडे पाहूनही दुर्लक्ष केलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘या दोघांमध्ये नक्कीच भांडण झालं असावं, म्हणूनच ती अशी वागतेय. उलट अनित कपूर खूप नम्रतेनं वागत आहेत’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

पहा व्हिडीओ-

सोशल मीडियावर ही छोटीशी क्लिप व्हायरल होत असली तरी नंतर माधुरी आणि अनिल कपूर हे एकमेकांसोबत एकत्र फोटोसाठीही पोझ देताना दिसले. या फोटोशूटच्या आधीचा हा क्षण होता. मात्र नंतर त्या दोघांमध्ये कोणतीच कटुता दिसली नाही. ‘मां बहन’च्या पोस्टरसमोर या दोघांनी पापाराझींसाठी बरेच पोझ दिले. यावेळी अनिल कपूर हे माधुरीच्या खांद्यावर हात ठेवून हसत फोटोसाठी पोझ देताना दिसले. तर माधुरीही या फोटोमध्ये खुश दिसली.

‘मां बहन’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुरुवारी प्रदर्शित झाला. 2 तास 7 मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर येताच प्रेक्षकांच्या पसंतीचा बनला आहे. सुरेश त्रिवेणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून याची कथा खूपच रंजक आहे. यामध्ये एक विधवा आई आणि तिच्या दोन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. अचानक एकेदिवशी त्यांच्या घरातील किचनमध्ये शेजारच्याचा मृतदेह आढळतो. यानंतर कथेत जबरदस्त ट्विस्ट येतो.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे